Tuesday, August 9, 2022

पूजा चव्हाणच्या मृत्युला कारणीभूत असणाऱ्या संजय राठोडला पुन्हा मंत्रीपद दिलं जाणं हे अत्यंत दुदैवी" ; भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी केलं ट्विट ...

वेध माझा ऑनलाइन - यवतमाळमधील शिवसेना नेते आणि बंजारा समाजाचे नेते संजय राठोड यांनी शिंदे सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना गोपनियतेची शपथ दिली. त्यामुळे, ते आता फडणवीस आणि चंदकांत पाटील यांच्यासोबत मंत्रीमंडळात दिसणार आहे. ज्या भाजपने त्यांच्या राजीनाम्यासाठी राळ उठवली होती, आंदोलने केली होती तेच आता भाजपसोबत मंत्री असणार आहेत. त्यामुळे, भाजपाची चांगलीच कोंडी होण्याची शक्यता आहे. याच दरम्यान भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी एक ट्विट केलं आहे. 

"पूजा चव्हाणच्या मृत्युला कारणीभूत असणाऱ्या माजी मंत्री संजय राठोडला पुन्हा मंत्रीपद दिलं जाणं हे अत्यंत दुदैवी" असं म्हटलं आहे. तसेच लडेंगे… .जितेंगे असंही त्यांनी सांगितलं. चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "पूजा चव्हाणच्या मृत्युला कारणीभूत असणार्या माजी मंत्री संजय राठोड ला पुन्हा मंत्रीपद दिलं जाणं हे अत्यंत दुदैवी आहे. संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झालेला असला तरीही त्याच्या विरुद्धचा माझा लढा मी सुरूचं ठेवलेला आहे. माझा न्याय देवतेवर विश्वास. लडेंगे….जितेंगे" असं चित्रा वाघ यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. 


No comments:

Post a Comment