Sunday, September 3, 2023

तुमची सनेबरोबर विकासासाठी युती, मग आमचाही विकासासाठी घेतलेला निर्णय चुकीचा कसा ? प्रफुल पटेल यांचा शरद पवारांना सवाल ;

वेध माझा ऑनलाइन। २०१९ विधानसभा निवडणूकीत राष्ट्रवादीचे ५४ तर कॉँग्रेसचे ४४ आमदार निवडणू आले होते. जनेतेने आम्हाला विरोधी बाकावर बसवले होते. त्यामुळे सत्तेत बसण्याचा आमचा अधिकार नव्हता. परंतु तरीही आपण विकासाच्या मुद्यावर विचारधारा बाजूला ठेवून हिंदुत्ववादी शिवसेना सोबत सत्ता स्थापन केली. मग २०२३ मध्ये आम्हीही विकासासाठी सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला तर तो चुकीचा कसा अशा प्रश्नच प्रफुल्ल पटेल यांनी रविवारी अमरावतीमध्ये आयोजित नवचेतना महासभेतून शदर पवार यांना केला आहे.

राज्यातील सत्तेत सहभागी होऊन उपमुख्यमंत्री झालेल्या अजित पवार राष्ट्रवादी गटाची पहिलीच महासभा संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे पार पडली. राष्ट्रवादीचे वरीष्ठ नेते संजय खोडके यांनी या सभेचे आयोजन केले होते. या सभेला प्रफुल्ल पटेल यांच्यासह आमदार अमोल मिटकरी, युवाआघाडी प्रदेशाध्यक्ष सुरेश चव्हाण, महिला नेत्या सुरेखा ठाकरे, वसंत घुईखेडकर सह अमरावती विभागातील इतर स्थानिक नेते मंडळी उपस्थित होती. यावेळी प्रफुल पटेल यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. ते म्हणाले कॉँग्रेसमधून बाहेर पडूनच राष्ट्रवादीचा जन्म झाला. परंतु प्रत्येकवेळी आम्ही त्यांच्याशीच जवळीकता साधली.

२००४ मध्ये राष्ट्रवादीकडे ७१ तर कॉँग्रेसकडे ६९ उमेदवार होते. परंतु तरीही मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा झाला नाही. तर विदर्भातही कॉँग्रेस स्वत:ला मोठा भाऊ सांगत असल्याने याठिकाणी राष्ट्रवादी पक्षही वाढू शकला नाही. २०१९ मध्ये आम्हाला बहुमत नसतानाही आम्ही हिंदूत्ववादी शिवसेने सोबत गेलो. यावेळी कॉँग्रेसचा विरोध असतानाही शरद पवार यांनी कॉँग्रेसच्यानेत्यांची मनधरणी करुन महाविकास आघाडी स्थापन केली. विकासासाठी ही महाविकास आघाडी झाल्याचे सांगत होते. मग जर २०२३ मध्ये आम्ही विकासासाठी सत्तेत सहभागी झालो तर चुक काय केली असा प्रश्न प्रफुल्ल पटेल यांनी उपस्थित केला. तसेच सध्या मोदींना हरविण्यासाठी देशातील विरोधकांनी स्थापन केलेली आघाडीचे नाव इंडिया नसून आय डॉट. एन डॉट, डी डॉट, आय डॉट, ए डॉट असे असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

No comments:

Post a Comment