Sunday, September 3, 2023

आज मराठा आरक्षणाबाबत मंत्रिमंडळ उपसमितीची सह्याद्रीवर बैठक ;

वेध माझा ऑनलाइन।  जालन्यात झालेल्या लाठीचार्जविरोधात राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे जालन्यातील घटनेनंतर मराठा आरक्षणाच्या हालचालींना आता वेग आला आहे. आज मराठा आरक्षणाबाबत मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक  दुपारी सह्याद्रीवर पार पडणार आहे. बुलढाण्यातील शासन आपल्या दारी कार्यक्रम, पुण्यातील विविध कार्यक्रमांना गैरहजर राहिल्यानंतर आजच्या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार हजर राहणार का ? याकडे सगळ्यांच लक्ष लागले आहे. 

दादांच्या अनुपस्थितीवरुन विरोधकांची टीका
राज्य शासनाच्या बुलढाण्यातील शासन आपल्या दारी कार्यक्रमाला, पुण्यातील विविध कार्यक्रमांना अजित पवार उपस्थित नव्हते. त्यामुळंच राजकीय वर्तुळात पुन्हा एका चर्चेला सुरुवात झालीय. जालन्याच्या लाठीमार प्रकरणानंतर अजित पवारांनी अनेक कार्यक्रमांना दांडी मारली त्यामुळे जालन्यातील घटनेनंतर महायुतीतील राष्ट्रवादीत नाराजीच्या चर्चा सुरू झाल्या आहे. विरोधकांना  आयता मुद्दा मिळाला आहे.  दादांच्या अनुपस्थितीवरुन विरोधकांनी टीका केली आहे. 

No comments:

Post a Comment