वेध माझा ऑनलाइन। महाराष्ट्र शासनाच्या कल्याणकारी योजना कराड व परिसरातील सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी उद्या ( सोमवार दि 4 रोजी ) सोमवार पेठेतील नवीन कृष्णाबाई मंगल कार्यालय याठिकाणी सकाळी ९-०० ते सायंकाळी ५-०० वाजेपर्यंत “ शासन आपल्या दारी ” हे अभियान राबविण्यात येणार आहे अशी माहिती युवा नेते अजय पावसकर मित्र परिवाराने दिली आहे .
सोमवार पेठेतील युवा नेते अजय विनायक पावसकर यांनी या अभियानाचे आयोजन केले असून मा श्री डॉ अतुलबाबा भोसले यांच्या शुभहस्ते या योजनेचे उदघाटन होणार आहे विक्रम पावसकर(बाबा) (प्रदेश उपाध्यक्ष भाजपा महाराष्ट्र राज्य) धैर्यशील कदम(सातारा जिल्हाध्यक्ष भाजपा) विनायकपावसकर(आण्णा) (ज्येष्ठ नगरसेवक कराड नगरपरिषद कराड) मा श्री एकनाथ बागडी (शहर अध्यक्ष भाजपा) यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे
या अभियानामध्ये रेशन कार्ड नोंदणी व दुरुस्ती , सिटी सर्व्हे उतारा आणि नकाशा व फेरफार , प्रधानमंत्री किसान योजना माहिती , सर्व प्रकारचे दाखले, सात बारा उतारे, फेरफार, जन्म-मृत्यू दाखले , बचत गट स्थापना , प्रधानमंत्री आवास योजना इ. , नवीन वीज कनेक्शन, मीटर दुरुस्ती, वीज बिल तक्रार निवारण, ड्रायव्हिंग लायसन्स, विवाह नोंदणी, आधार कार्ड नोंदणी व दुरुस्ती,संजय गांधी निराधार योजना, मतदान कार्ड नोंदणी व दुरुस्ती , आयुष्यमान भारत कार्ड काढणे व इतर सरकारी विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व योजना आणि सुविधा यांचा लाभ घेता येणार आहे.
वरील सुविधांबरोबरच मोफत आरोग्य तपासणी शिबिराचेही आयोजन करण्यात आले असून रक्तदाब, मधुमेह, आणि नेत्र तपासणी करण्यात येणार आहे. सोमवार दि. दिनांक ४ सप्टेंबर २०२३ सकाळी ९-०० ते सायंकाळी ५-०० वाजेपर्यंत हे अभियान सुरू असणार आहे.
जास्तीत जास्त लोकांनी या अभियानात सहभागी होऊन शासनाच्या वेगवान अंमलबजावणीचा लाभ घ्यावा असे आवाहन अजय पावसकर मित्र परिवाराने केले आहे
No comments:
Post a Comment