Thursday, November 30, 2023

मंत्री छगन भुजबळ यांना धमकी ; सलग बारा मेसेज पाठवून दिली धमकी ;

वेध माझा ऑनलाइन। राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री यांना धमकीचे मेसेज आले आहे. एकामागे एक सलग बारा मेसेज पाठवून त्यांना धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंत्री राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांना पुन्हा धमकीचे मेसेज आले आहेत. एकामागे एक सलग बारा मेसेज पाठवून त्यांना धमकी देण्यात आली आहे. छगन भुजबळ अब्दुल सत्तार यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्यासाठी छत्रपती संभाजीनगरात आले होते. यावेळी त्यांच्या मोबाईलवर सारखे कॉल येत होते. परंतु भुजबळ यांनी कॉल घेतले नाही. यामुळे त्यांना धमक्यांचे सलग बारा मेसेज करण्यात आले. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष मनोज घोडके यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंत्री छगन भुजबळ मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास विरोध करत आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये, अशी त्यांची मागणी आहे. मराठा समाजास वेगळे आरक्षण देण्यास आपला विरोध नसल्याचे ते सांगत आहे. आपली भूमिका मांडण्यासाठी ते ओबीसी समाजाच्या सभा घेत आहेत. राज्यात एकीकडे मनोज जरांगे पाटील यांच्या दौराचा चौथा टप्पा सुरु झाला आहे. भुजबळ यांनीही दोन सभा राज्यात घेतल्या आहेत. त्या सभेतून ते मराठा आरक्षणाविरोधी भूमिका घेत असल्याचा आरोप केला जात आहे. यामुळे भुजबळ यांना गेल्या काही दिवसांपासून धमक्या मिळत आहे. त्यांच्या दौऱ्यांना विरोध होत आहे. छत्रपती संभाजीनगरात अब्दुल सत्तार यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्यासाठी आले असताना त्यांना धमक्यांचे मेसजे आले. सौदागर सातनाक नामक व्यक्तीच्या क्रमांकावरून धमकी आल्याचा तक्रार पोलिसांत दिली आहे भुजबळ यांना धमक्यांचे फोन आल्यानंतर छत्रपती संभाजीनगरातील पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. छत्रपती संभाजीनगरातून भुजबळ यांना धमकी आल्याची ही दुसरी घटना आहे. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे. तसेच राज्य सरकारकडून छगन भुजबळ यांच्या बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. पोलिसांनी फोन करणाऱ्यांचा शोध सुरु केला आहे.
वेध माझा ऑनलाइन।  यशवंतनगर (ता. कराड) येथील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याने आज जिल्ह्यातील ऊस दराची कोंडी फोडली. सर्वात प्रथम दर जाहीर करताना 3100 रुपयाचा पहिला हप्ता जाहीर केला. 

गेल्या एक महिन्यापासून गळीत हंगामाला सुरुवात झाली आहे. तरीही कोणीही दर जाहीर केला नव्हता. या पार्श्वभूमीवर आज जिल्ह्यातील सर्व सहकारी, खाजगी साखर कारखाने, शेतकरी संघटना व जिल्हा प्रशासन यांची बैठक आज सातारा येथे पार पडली. या बैठकीत सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील यांनी कारखान्याचा पहिला हप्ता 3100 रुपये सर्वात प्रथम जाहीर केला.
सह्याद्री कारखान्याने सन 2023- 24 च्या गळीत हंगामात येणाऱ्या उसाला पहिला हप्ता 3100 रुपये जाहीर केल्याने ऊस उत्पादक शेतकरी वर्गातून आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सर्वात प्रथम उसदर जाहीर करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या सह्याद्रीने दिलासा दिला आहे दरम्यान  इतर कारखान्यांनीही ३१०० रुपयांच्या आसपास आपलेही दर जाहीर केले


अजितदादा भेकड नाहीत, मग स्वतःचा पक्ष का काढला नाही ? शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांचा परखड सवाल ;

वेध माझा ऑनलाईन। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोन गटांत विभागला गेल्यानंतर आज कर्जत येथे अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाच्या दोन दिवसीय राज्यव्यापी शिबिराला सुरुवात झाली आहे. या शिबिरात बोलताना प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शरद पवार गटाकडून होत असलेल्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. तसंच निवडणूक आयोगाच्या सुनावणीदरम्यान अजित पवार यांच्यासाठी वापरण्यात आलेल्या भेकड या शब्दावरूनही पवार गटाला खडेबोल सुनावले. या पार्श्वभूमीवर आता शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी तटकरेंवर पलटवार करत प्रश्नांची सरबत्ती केली आहे.
ईडीच्या दबावातून अजित पवार यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी सत्तेत सामील होण्याचा निर्णय घेतला आणि आता शरद पवार यांच्याबाबतही हे लोक कृतघ्न झाल्याचा हल्लाबोल विकास लवांडे यांनी केला आहे. लवांडे यांनी याबाबत आपल्या 'एक्स' हँडलवर लिहिलेली ही पोस्ट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत हँडलवरून देखील रिपोस्ट करण्यात आली आहे.

तटकरेंची फटकेबाजी अन् विकास लवांडेंचे १० तिखट सवाल
"अजितदादा भेकड नाहीत, दिलेला शब्द पाळणारे  अजितदादा, प्रशासनावर वचक असणारे अजितदादा, भाजपसोबत सरकार आणि ४३ आमदारांचा पाठिंबा आणि घड्याळ तेच, वेळ नवीन....वगैरे वगैरे भाषणबाजी करणारे निवडणूक आयोगाकडे नोंदणी नसलेल्या गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब आपण माझ्या सामान्य प्रश्नांची उत्तरे द्याल का?" असं म्हणत विकास लवांडे यांनी सुनील तटकरे यांना हे प्रश्न विचारले आहेत.

काय आहेत लवांडे यांचे प्रश्न?
 १) अजितदादा भेकड नसते, खरंच हिंमत असती तर स्वतःचा नवा पक्ष स्थापन केला असता. पण तसे न करता पक्ष संस्थापक आदरणीय शरद पवारसाहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर कुणाच्या आधाराने हक्क दाखवत आहात? स्वाभिमानी अजितदादा दिल्लीपुढे का झुकले? EDला का घाबरले ? त्यांनी EDला  पवार साहेबांनी जसे आव्हान दिले होते, तसे जाहीर आव्हान का दिले नाही? तुम्ही सर्वजण भेकड की अटकेला घाबरले?

२) प्रशासनावर वचक असता तर प्रशासनातील प्रचंड भ्रष्टाचार,कामचुकारपणा कसा व का वाढला? जनतेचे जातीचे दाखले ते इतर योजनांची विविध स्तरावर कामे प्रलंबित का आहेत? झिरो पेंडंसी का नाही? मागील ४ महिन्यात कोणती सार्वजनिक महत्त्वाची कामे केलीत? मराठा आरक्षण मुद्यावर काय भूमिका बजावली? भुजबळांना पाठिंबा की मराठा आंदोलकांना पाठिंबा हे कधी सांगणार? 

३) सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजपा घेत नाही त्याला तुमचा पाठिंबा आहे का? कारण आधी अजितदादा सतत मागणी करत होते आत्ता गप्प का?

४) ४३ आमदारांची घेतलेली पाठिंब्याची प्रतिज्ञापत्र दिशाभूल करून आणि दबावाखाली घेतली की नाही? त्यांचा सर्वांचा एकत्रित फोटो, व्हिडिओ जनतेला का दाखवत नाही?
 
५) खोके सरकारमध्ये  अजितदादा DCM-2 आहेत, हे दादांचे प्रमोशन की डिमोशन आहे ? हा दादांचा स्वाभिमान की आणखी काय समजायचे ?
 
६) 'घड्याळ तेच वेळ नवीन' कुठून येतो इतका आत्मविश्वास? दिल्लीच्या अदृश्य शक्तीमुळेच ना? 

७) देशाच्या पंतप्रधानांनी भोपाळ सभेत जाहीरपणे केलेला ७० हजार कोटींच्या घोटाळ्याचा व भ्रष्टाचाराचा आरोप केला तो खरा की खोटा होता? त्याबाबत अधिकृत खुलासा कधी होईल? 

८) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आजपर्यंत भाजपाने जे जे विविध भ्रष्टाचाराचे आरोप केले होते ते कुणावर केले होते? पक्षाची कायमच बदनामी कुणामुळे होत होती? 

९) तुम्हाला सर्वांना अनेक वर्ष मंत्रिपदे मिळाली, सत्ता उपभोगायला मिळाली, निवडणुकीत मते मिळाली ती कुणामुळे? राज्यात तुमच्या सर्वांच्या हातात सत्ता व पक्ष होता तो पक्ष का वाढवला नाही ? लहान मोठे सर्वत्र ठेकेदार कुणी जपले होते ? 

१०) आपल्याला राजकीय पटलावर ज्यांनी मोठी ओळख निर्माण करून दिली त्या आदरणीय शरद पवार साहेबांच्या बाबत कृतज्ञता व्यक्त करता येत नसेल तर किमान कृतघ्नपणा तरी का करता?

शिंदे- फडणवीस सरकारकडून कराडच्या विमानतळ विस्तारीकरण्यासाठी निधी मंजूर ; ;

वेध माझा ऑनलाईन । एम ए डी सी अंतर्गत असणाऱ्या विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी राज्य सरकारकडून 221.51 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून त्यास प्रशासकीय वित्तीय मान्यता दिली असल्याचा शासन आदेश प्रसिद्ध झाला आहे. पावसाळी अधिवेशनात माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण यांनी विमानतळ विस्तारिकरणांबाबतचा प्रश्न सभागृहात उपस्थित केला होता. याविषयी  राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढील तीन महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्च स्तरीय मिटिंग घेण्याचे आश्वासन दिले होते त्यानुसार 20 ऑक्टोबर 2023 रोजी घेण्यात आलेल्या बैठकीत एम ए डी सी ने कराड विमानतळाच्या विकास व विस्तार कामांसाठी सादर केलेल्या 221.51 कोटी रुपयांच्या प्रस्तावास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे 

याविशया बाबत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते कि, कराड विमानतळ विस्तारीकरणाबाबत जर शेतकऱ्यांच्या काही अडचणी नसतील तर निधीची कोणतीही कमी होणार नाही. कराडचे विमानतळ हे अत्यंत महत्त्वाचं व स्ट्रेटेजिक विमानतळ आहे त्यामुळे जर त्याचा विस्तार करता आला तर त्याचा नक्कीच त्या भागातील लोकांना फायदा होऊ शकतो.  पश्चिम महाराष्ट्रातील विमानतळांचा विचार केला तर कराड सारख्या ठिकाणी एक मध्यवर्ती विमानतळ असणं अत्यंत गरजेचं आहे. त्यानुसार  कराड विमानतळ विस्तारिकरणासाठी निधी मिळाला असून लवकरच एम ए डी सी कडून कामास सुरुवात होणार आहे.

Wednesday, November 29, 2023

बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक, ...दत्ता दळवी...नाम तो सुना होगा !...

वेध माझा ऑनलाइन। शिवसेना संस्थापक दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरेंनी अनेक शिवसैनिक घडवले होते. त्यातील काही शिवसैनिक अजूनही आहेत. शिवसेना ही मुंबई, महाराष्ट्राचा जीव असल्याची चर्चा असायची. अशातच बाळासाहेबांनी आनंद दिघेंसारखे शिवसैनिक घडवले. त्यातील आजही अनेकजण आहेत आणि काही ईडीच्या धाकाने उद्धव ठाकरेंना सोडून भाजपसोबत गेले आहेत. मात्र संजय राऊतांसारखे नेते अजूनही उद्धव ठाकरेंसोबत आहेत. अशातच काही कट्टर शिवसैनिकांपैकी एक शिवसैनिक म्हणजे दत्ता दळवी आहेत. शिवराळ भाषा, वागण्यात बेदरकारपणा, मुंबईचे माजी महापौर, धाडसी आणि आक्रमक शिवसैनिक म्हणून आजही दत्ता दळवींची लोकं आठवण काढतात. दत्ता दळवी हे नाव मध्यंतरी शांत होते, मात्र पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहे.

कडवट शिवसैनिकांपैकी बाळासाहेबांच्या विश्वासातील सच्चा आणि कडवट शिवसैनिक म्हणजे दत्ता दळवी आहेत. भांडुपमध्ये रविवारी शिवसेना ठाकरे गटाच्या कोकण पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा होता. या मेळाव्यात माजी महापौर आणि उपनेते दत्ता दळवी यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्ला केला आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांवर जाहीर भाषणात शिवीगाळ केली. त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई करत अटक केली असून दत्ता दळवी हे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे

कोण आहेत दळवी?

शिवसेना स्थापनेच्या वेळी बाळासाहेब ठाकरेंनी अनेक निस्सीम कार्यकर्ते कडवट शिवसैनिक तयार केले होते. त्यापैकी दत्ता दळवी हे नाव आहे. दळवींनी आपली सामान्य शिवसैनिक म्हणून कारकीर्द केली आहे. आपल्या आक्रमक स्वभावामुळे ते अल्पावधीतच पुढं आले. आणि बाळासाहेबांचे विश्वासू बनले. शिवसेना विभागप्रमुख ७ ची त्यांनी जबाबदारी घेतली आहे. त्यानंतर मुंबईचे महापौर म्हणून त्यांनी २००५ ते २००७ सालात काम केलं आहे. ईशान्य मुंबईत दत्ता दळवींचा मोठा प्रभाव आहे. आज अनेक शिवसेना मंत्री, आमदार, खासदार शिंदे गटात गेले आहेत. मात्र दत्ता दळवींनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली नाही.
दत्ता दळवींच्या शिवीगाळ करण्याच्या कृत्यावर भांडुप पोलीसानी ठाण्यात तक्रार दाखल केली असून (A) 153 (B) 153 (A) (1) या कलमान्वये त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

समलैंगिक संबंधात खंड पडल्याने महाविद्यालयीन तरुणाची निर्घृण हत्या

वेध माझा ऑनलाइन। विद्येचे माहेर घर असलेल्या पुण्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. समलैंगिक संबंधात खंड पडल्याने एका महाविद्यालयीन तरुणाची धारदार शस्त्राने सपासप वार करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे.वाघोली परिसरात मंगळवारी सायंकाळी ही घटना घडली. महेश साधू डोके (वय 21 ) असे मृत तरुणाचे नाव आहे. महेश वाल्हेबोलाई, (ता.हवेली) येथील रहिवासी होता. ओळखीतील तरुणाने महेशची हत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महेश डोके हा वाघोली येथील बीजीएस महाविद्यालयात बीबीएच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत होता तो होस्टेलमध्ये राहत होता. महेश मंगळवारी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास महाविद्यालयातून होस्टेलच्या दिशेने जात होता. बकोरी मार्गावर एका तरुणाने महेशच्या डोक्यावर आणि गळ्यावर कोयत्याने सपासप वार केले आणि पसार झाला. रक्तभंबाळ अवस्थेत स्थानिक तरुणांनी महेशला जवळच्या खासगी हॉस्पिटलमध्ये हलवले. मात्र, डॉक्टरांनी त्याला ससून हॉस्पिटलमध्ये हलवण्याचा सल्ला दिला. मात्र, वाटेतच महेशची प्राणज्योत मालवली.

मित्रासोबत समलिंगी संबंध
महेश आणि त्याचा मित्र सागर गायकवाड यांच्यात समलैंगिक संबंध असल्याचे समोर आले आहे. सागर गायकवाड हा कंत्राटदार असल्याचे समजते. परंतु महेश याने आरोपीसोबत संबंध ठेवण्यास नकार दिला. त्यामुळे आरोपी संतापला होता. समलिंगी संबंधांत खंड पडल्याने आरोपी मित्राने महेशवर कोयत्याने सपासप वार करून हत्या केली. आरोपी सध्या फरार आहे.

कृष्णकांत कमलेशकुमार यादव याने दिलेल्या तक्रारीवरून सागर गायकवाड याच्याविरुद्ध लोणीकंद पोलिसांत निर्घृण हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी गायकवाड फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी दोन पथके रवाना करण्यात आली आहेत. लोणीकंद पोलिस पुढील तपास करत आहेत

कराडच्या विमानतळ विस्तारीकरणास 221.51 कोटींचा निधी मंजूर ; माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण यांनी पावसाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केल्याने शासनाकडून निधी मंजूर ;

वेध माझा ऑनलाइन।  येथील एम ए डी सी अंतर्गत असणाऱ्या विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी राज्य सरकारकडून 221.51 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून त्यास प्रशासकीय वित्तीय मान्यता दिली असल्याचा शासन आदेश प्रसिद्ध झाला आहे. पावसाळी अधिवेशनात माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण यांनी विमानतळ विस्तारिकरणांबाबतचा प्रश्न सभागृहात उपस्थित केला होता. त्यावेळी आ.पृथ्वीराज चव्हाण म्हणाले होते कि, महाराष्ट्रातील तालुका ठिकाणचं पहिलं विमानतळ कराड येथे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी सुरू केलं होतं कारण कराड हे पश्चिम महाराष्ट्रातील मध्यवर्ती ठिकाण आहे. कराड विमानतळ विस्तारीकरणासाठी तेथील ग्रामस्थांचा विरोध नसून त्याबाबत योग्य तो निधी त्यांना हवा आहे यासाठी राज्य शासनाकडून त्वरित तोडगा काढण्याची अपेक्षा आहे. या आ. चव्हाण यांच्या मागणीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढील तीन महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्च स्तरीय मिटिंग घेण्याचे आश्वासन दिले होते त्यानुसार 20 ऑक्टोबर 2023 रोजी घेण्यात आलेल्या बैठकीत एम ए डी सी ने कराड विमानतळाच्या विकास व विस्तार कामांसाठी सादर केलेल्या 221.51 कोटी रुपयांच्या प्रस्तावास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे अशी माहिती आमदार पृथ्वीराज चव्हाण कार्यालयाकडून प्रसिद्धीस देण्यात आली आहे

कराड विमानतळ विस्तारिकरणासाठी ज्यांच्या जमिनी गेल्या आहेत त्यांना योग्य मोबदला देण्याची आवश्यकता असल्याची मागणी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत केली होती. त्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते कि, कराड विमानतळ विस्तारीकरणाबाबत जर शेतकऱ्यांच्या काही अडचणी नसतील तर निधीची कोणतीही कमी होणार नाही. कराडचे विमानतळ हे अत्यंत महत्त्वाचं व स्ट्रेटेजिक विमानतळ आहे त्यामुळे जर त्याचा विस्तार करता आला तर त्याचा नक्कीच त्या भागातील लोकांना फायदा होऊ शकतो.  पश्चिम महाराष्ट्रातील विमानतळांचा विचार केला तर कराड सारख्या ठिकाणी एक मध्यवर्ती विमानतळ असणं अत्यंत गरजेचं आहे. त्यानुसार माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या पाठपुराव्यामुळे कराड विमानतळ विस्तारिकरणासाठी निधी मिळाला असून लवकरच एम ए डी सी कडून कामास सुरुवात होणार आहे.

कराड शहर व तालुक्यातील दुकानांना आठ दिवसात मराठी भाषेत पाटया लावा ,अन्यथा आंदोलन करणार ; मनसे चे निवेदन ;

वेध माझा ऑनलाइन।
 सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही कराड शहर व तालुक्यातील अनेक दुकानांना इंग्रजी भाषेत पाटया आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱया संमंधित विभागाच्या अधिकाऱयांवर कारवाई करावी तसेच आठ दिवसांत इंग्रजी पाटया काढुन मराठी पाटया लावाव्यात अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा ईशारा मनसेच्या वतीने देण्यात आला आहे.

याबाबत तहसिलदार विजय पवार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी, जिल्हाअध्यक्ष ऍड.विकास पवार, तालुका अध्यक्ष दादासाहेब शिंगण, शहरअध्यक्ष सागर बर्गे, विद्यार्थी सेनेचे जिल्हाअध्यक्ष विनायक भोसले, पै.सतिश यादव,नितीन महाडीक, हणमंत भिंगारदेवे, नितीन शिंदे, अमोल सकट, विश्वास संकपाळ केतन जाधव,शंभूराजे भिसे व कार्यकर्ते उपस्थित होते.

वास्तवीक सक्तीपेक्षा महाराष्ट्रातील भाषेविषयी आदर असणे गरजेचे आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही काही व्यवसाईक दुकानाला मराठीत पाटी लावत नाही. सर्वोच्च न्यायालयाने मराठी पाटया लावण्यासाठी 25 नाहेंबर पर्यंत मुदत दिली होती. मात्र कराड शहर व तालुक्यातील अनेक दुकानांना इंग्रजीत पाटया आहेत. प्रशासनाने अशा दुकानांचा सर्व्हें करावा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱया संमंधित विभागाच्या जबाबदार अधिकाऱयांविरोधात करावाई करावी. तसेच येत्या आठ दिवसांत सर्व दुकानांना मराठीत पाटया लावण्यात याव्यात अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा ईशारा मनसेच्या वतीने देण्यात आला आहे.

नालायक’ शब्दावरून नेत्यांमध्ये कलगीतुरा ;

वेध माझा ऑनलाइन। राज्यात काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा सोडवता सरकारला नाकी नऊ आले आहेत. अशातच आता अवकाळी पावसाने राज्यातील काही भागात धुमशान मचावल्याने शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यावेळी नुकसान भरपाईसाठी मुख्यमंत्र्यांनी आदेश द्यावेत अशी मागणी उद्धव ठाकरेंनी सरकारकडे केली. एकनाथ शिंदे तेलंगणाच्या प्रचारासाठी गेले असता, यावर उद्धव ठाकरेंनी राज्याचा कारभार करण्यासाठी असा माणूस नालायक असल्याचे वक्तव्य केलं आहे. या वक्तव्यावरून राजकीय नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगला आहे. यावर आता शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाईंनी निषेध व्यक्त केला आहे.

एकनाथ शिंदेंवर उद्धव ठाकरेंनी नालायक अशी टीका केली आहे. यावर आता शंभूराज देसाईंनी निषेध व्यक्त केला आहे. नालायक हा शब्द संबोधनं योग्य नाही. यावर काय कारवाई करता येईल हा निर्णय आता पथक घेईल, असे असंसदीय शब्द वापरणाऱ्या उद्धव ठाकरेंची हतबलता यातून समजून येते. त्यांच्या भाषेत उत्तर द्यावे लागले तर उत्तर देऊ, असा इशारा आता शंभूराज देसाईंनी दिला आहे. या एका शब्दामुळे आता राजकीय नेत्यांमध्ये कलगीतुरा पाहायला मिळत आहे
एकनाथ शिंदें, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी गेले असता, उद्धव ठाकरेंनी सत्ताधारी नेत्यांचे कान उपटले आहेत. मातोश्री येथे मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी सत्ताधारी पक्षांना चांगलच झापलं आहे. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदेंवर नालायक अशी टीका केली. या टीकेवरून आता असंसदीय शब्द वापरल्याचं वक्तव्य शंभूराज देसाईंनी केलं असून यावर आता नालायक शब्दाचा अर्थ राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाडांनी सांगितला आहे.

नालायक अर्थ
आव्हाडांनी नालायक म्हणजे useless युजलेस असा अर्थ असल्याची माहिती ट्विट करत दिली आहे. नालायक हा शब्द असंसदीय आहे का? पोलीसांनी सिध्द करावे ….. सध्याच्या परिस्थितीत जनता सगळ्यांना नालायक म्हणते मग …. किती जणांना आत घालणार…इंग्रजी मध्ये नालायक म्हणजे “useless”, असे ट्विट करत आव्हाडांनी नाव न घेता शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे.

ठाकरे गटाचे सुनील प्रभू यांचा यू-टर्न! शिवसेना आमदार अपात्रता सुनावणीत काय घडलं? वाचा सविस्तर...

वेध माझा ऑनलाइन। शिवसेना आमदार अपात्रता सुनावणी आजपासून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुरू झाली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रतोद आमदार सुनील प्रभू यांची उलट तपासणी झाली असता उलट तपासणी दरम्यान सुनील प्रभू यांनी आपल्या साक्षीत बदल केला. दुपारच्या जेवणाच्या सुट्टीच्या आधी नोंदवलेल्या साक्षीत अध्यक्षांच्या परवानगीने साक्ष बदलण्यात आली. 

विधिमंडळात ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची शिंदे गटाचे वकील अॅड. महेश जेठमलानी यांच्याकडून उलट तपासणी झाली. यामध्ये व्हीप, व्हीपची सत्यता, प्रभू यांची प्रतोपपदाची नियुक्ती, आमदारांना पाठवलेले पत्र, पक्ष बैठकीतील ठराव आदी मुद्यांवर जेठमलानी यांच्याकडून प्रश्नांची सरबती झाली. 

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांना सुनील प्रभू यांनी पत्र पाठवले होते. त्यावरून जेठमलानी यांनी प्रश्न विचारले. जेठमलानी यांनी 22 जून 2022 रोजीचे पत्र एकनाथ शिंदे यांना कोणत्या माध्यमातून दिले असा प्रश्न प्रभू यांना केला. त्यावर व्हॉट्स अॅपच्या माध्यमातून हे पत्र दिले असल्याचे उत्तर त्यांनी दिले. आपण आता यावेळी व्हॉट्स अॅप मेसेज सादर करू शकता का? असा प्रश्न जेठमलानी यांनी केला. त्यावर प्रभू यांनी असमर्थता दर्शवत आता मी नेमकं सांगू शकत नसल्याचे सांगितले.

जेठमलानी यांनी आपण हा व्हॉट्स अॅपवरील मेसेज आपल्या फोनमध्ये सेव्ह करून ठेवला आहे का? असा प्रश्न केला. त्यावर प्रभू यांनी मला नेमकं आठवत नाही. मी हा मेसेज माझ्या मोबाईलवरून पाठवला की कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या मोबाईलवरून... असे उत्तर दिले. 

यानंतर काही आणखी काही प्रश्नोत्तरे झाली. यावर सुनील प्रभू यांनी उत्तरे दिल्यानंतर दुपारच्या जेवणाची सुट्टी झाली. लंच ब्रेकनंतर सुनील प्रभू यांनी आपल्या साक्षीत बदल करण्याची परवानगी विधानसभा अध्यक्षांना केली.

सुनील प्रभू यांचा यू टर्न
लंच ब्रेकनंतर सुनील प्रभू यांनी साक्ष बदलली. एकनाथ शिंदे यांना व्हॉट्सअॅप नव्हे तर मेलवर पत्र पाठवल्याचं प्रभू यांनी सांगितलं. लंच ब्रेकमध्ये मी तपासले तेव्हा ते पत्र मेलवर पाठवल्याचे आढळले. त्यामुळे साक्ष बदला अशी मागणी सुनील प्रभू यांनी केली. यावर विधानसभा अध्यक्ष यांनी त्यासाठी परवानगी दिली.  महेश जेठमलानी यांनी व्हॉट्सअॅपवर नोटीस पाठवल्याचे पुरावे मागितले होते. 

साक्ष बदलल्यानंतर सुनील प्रभू यांना अॅड. जेठमलानी यांनी प्रश्न विचारणा केली. जेठमलानी यांनी तुम्ही स्वतः हा ई-मेल पाठवला? असा प्रश्न विचारला. त्यावर हा ई-मेल पक्ष कार्यालयातील जोशी यांनी हा ई-मेल पाठवला असल्याचे सांगितले. मी माझ्या कार्यालयाकडून ही माहिती घेतली. यावेळी माझ्यासोबत माझे सहकारी आणि सहाय्यक होते, त्यांना मी हे विचारले त्यांच्याकडून ही माहिती घेतली असल्याचे प्रभू यांनी सांगितले. अॅड. जेठमलानी यांनी पक्ष कार्यालयातील कर्मचारी जोशी यांना तुम्ही त्यांना नेमका कुठला प्रश्न विचारला? असे सांगितले. त्यावर प्रभू यांनी मी त्यांना अस विचारलं की एकनाथ शिंदे यांना पाठवलेली नोटीस मी व्हाट्सअप वर पाठवली असं म्हणालो. पण मला आठवत नाहीये आपण त्या दिवशी पाठवलेले मेल पण चेक करा त्यावेळी त्यांना तो मेल आढळला व त्यांनी मला सांगितलं असल्याचे प्रभू यांनी म्हटले. पटलावर सत्य माहिती समोर यावी यासाठी साक्ष बदल करण्याची विनंती केली असल्याचेही प्रभू यांनी सुनावणी दरम्यान सांगितले. 


... लवकरच डॉ अतुल भोसले उपमुख्यमंत्र्यांना भेटणार :

वेध माझा ऑनलाइन। येथील महापारेषण प्रकल्पात बाधित झालेल्या प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेण्यात आले आहे. पण त्यांना अद्याप सेवेत कायम करण्यात आलेले नाही. या प्रकल्पग्रस्तांना सेवेत कायम करावे, यासाठी त्यांच्या शिष्टमंडळासमवेत लवकरच उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांना भेटण्याची ग्वाही भारतीय जनता पार्टीचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले यांनी दिली. 

कराड येथील शासकीय विश्रामगृहात मुंढे येथील प्रकल्पग्रस्तांची बैठक डॉ. अतुल भोसले यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. यावेळी प्रकल्पग्रस्तांनी आपली कैफीयत डॉ. भोसले यांच्यासमोर मांडली. मुंढे येथील महापारेषणच्या प्रकल्पासाठी येथील नागरिकांच्या जमिनींचे ४ वेळा अधिग्रहण करण्यात आले. त्यावेळी प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यानुसार २०१६ साली ३५ जणांना नोकरीत घेण्यात आले. प्रशिक्षणार्थी म्हणून नोकरीस लागलेल्या या प्रकल्पग्रस्तांना गेली ७ वर्षे नोकरीत कायमच करण्यात आलेले नाही. याप्रश्नी शासन दरबारी वेळोवेळी प्रयत्न करुनही हा प्रश्न मार्गी लागलेला नाही. त्यामुळे याप्रश्नी डॉ. अतुल भोसले यांनी पुढाकार घेऊन, शासनस्तरावर पाठपुरावा करावा, अशी आग्रही मागणी या प्रकल्पग्रस्तांनी शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीवेळी केली. 

यावेळी डॉ. भोसले यांनी मुंढे येथील प्रकल्पग्रस्तांसोबत ठामपणे उभे राहण्याची ग्वाही देत, नोकरीत असलेल्या सर्व प्रकल्पग्रस्तांना खास बाब म्हणून सेवेत कायम करावे, अशी मागणी उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांना भेटून करणार असल्याची माहिती दिली. यावेळी मुंढे गावचे उपसरपंच सागर पाटील, राहुल साळवे, राहुल जमाले, प्रदीप चव्हाण, रोहित यादव यांच्यासह प्रकल्पग्रस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Tuesday, November 28, 2023

छगन भुजबळ यांनी मंत्रिमंडळातून राजीनामा देऊन निघावं ; राज्यातील एका बड्या मंत्र्यानेच मागितला भुजबळांना राजीनामा ; आता मंत्रीच गेले भुजबळांच्या विरोधात ; काय आहे बातमी?

वेध माझा ऑनलाइन। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि शिंदे सरकारमधील अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याला त्यांनी कडाडून विरोध केला आहे. तसंच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावरही भुजबळ घणाघाती टीका करताना दिसत आहेत. अशातच त्यांच्या या भूमिकेला काही नेत्यांनी विरोध केला आहे. आता तर भाजपचे वरिष्ठ नेते आणि शिंदे सरकारमधील महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीच छगन भुजबळ यांना घरचा आहेर दिला आहे.दरम्यान छगन भुजबळ यांनी संयम पाळण्याची गरज आहे. आज त्यांच्याबद्दल लोकं आदराने बोलत आहेत. नंतर मात्र त्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी करावी लागेल, असं मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणालेत.छगन भुजबळ यांनी मंत्रिमंडळातून राजीनामा देऊन निघावं असंही ते म्हणाले

ओबीसींच्या हक्कांचा मुद्दा पुढे करून आंदोलन सुरू आहे. याची काहीच गरज नव्हती. विनाकारण दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होत आहे. ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद सुरु झाला आहे. हा वाद निरर्थक आहे. छगन भुजबळ यांनी संयम पाळण्याची गरज आहे. आज त्यांच्याबद्दल लोकं आदराने बोलत आहेत. नंतर मात्र त्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी करावी लागेल, असं मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणालेत.

छगन भुजबळ यांनी मंत्रिमंडळातून राजीनामा देऊन निघावं. मंत्रिमंडळातून बाहेर येऊन मग ओबीसींच्या प्रश्नांवर बोलावं. सरकारमध्ये असताना अशी भूमिका घेणं योग्य नाही. यामुळे सरकारमध्ये एक वाक्यता नाही, असा संदेश जातो. सरकार बाबतची विश्वासार्हता कमी होते. त्यामुळे छगन भुजबळ यांनी राजीनामा दिला पाहिजे. नाहीतर ते ओबीसींसाठी घेत असलेली भूमिका आणि त्यांच्या सुरु असलेल्या सभा याबाबत सरकारने विचार करावा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्र्यांनी याबाबत विचार केला पाहिजे, असं विखे पाटील म्हणालेत.
मराठा आरक्षणासंदर्भात जे आंदोलन सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवरती शासनाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता कुणाचंही आरक्षण कमी न करता मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे. त्यासाठी सरकारही प्रयत्नशील आहे. त्यादृष्टीने सरकारचे प्रयत्नही सुरू आहेत, असंही राधाकृष्ण विखे पाटील म्हणालेत.

शिंदे गटाचे वकील जेठमलानी म्हणतात ...शिवसेनेची घटनाच उद्धव ठाकरेंची मोठी अडचण करणार ; वाचा सविस्तर...

वेध माझा ऑनलाइन। शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी एक मोठा दावा केला आहे. येत्या काळात ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अडचणी वाढणार आहेत, असं त्यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरे गटाने जेवढी कागदपत्रे दिलेली आहेत. ती खोटी आहेत. कागदपत्रावर ज्या सह्या आहेत. त्या देखील खोट्या सह्या आहेत. शिवसेनेच्या घटनेनुसार पक्ष प्रमुखपद हे अस्तित्वातच नाहीये, त्यामुळे ठाकरेंच्या अडचणी वाढणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

आमदार अपात्रता प्रकरणी आज सुनावणी
शिवसेना पक्षाच्या आमदार अपात्रता प्रकरणाची आज सुनावणी होणार आहे. आजपासून पुढील चार दिवस सलग सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी होत आहे. याआधी ठाकरे गटाचे नेते सुनील प्रभू यांची साक्ष नोंदवण्यात आली आहे. आता आज पुन्हा आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी होणार आहे. त्या सुनावणीआधी शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबत मोठं विधान केलं आहे. यावेळी त्यांनी शिवसेनेच्या घटनेचा संदर्भ दिला आहे.

दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत फूट पडली. तेव्हा ठाकरे गटाने शिंदे गटातील आमदारांविरोधात अपात्रतेची याचिका दाखल केली. या प्रकरणी न्यायालने लवकरात लवकर सुनावणी घेण्याचे आदेश दिल्याने आता आज या प्रकरणी सुनावणी होत आहे. पुढचे चार दिवस ही सुनावणी चालेल. अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. तेव्हा त्यांनी राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर दावा केला. त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगासमोर याबाबत सुनावणी होत आहे.

राष्ट्रवादीची आज सुनावणी
राष्ट्रवादीचा पक्ष आणि चिन्हाबाबत आज संध्याकाळी 4 वाजता सुनावणी होणार आहे. पक्ष नेमका कुणाचा आणि राष्ट्रवादीचं घड्याळ हे निवडणूक चिन्ह नेमकं कुणाचं? याबाबत निवडणूक आयोगात आज सुनावणी होणार आहे. या सुनावणीसाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार काल रात्री दिल्लीत दाखल झाले आहेत. या सुनावणीसाठी शरद पवार आणि जितेंद्र आव्हाड उपस्थित राहणार आहेत. तर सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड दिल्लीला जाणार आहेत.

संजय शिरसाट पृथ्वीराज चव्हाणांना म्हणाले; तुम्ही गोट्या खेळत होता का?...काय आहे बातमी ...

वेध माझा ऑनलाइन। राज्यात मराठा आरक्षणाला वेगळं वळण लागलं आहे. काही दिवसांपासून मराठा समाज आरक्षणासाठी सरकारवर आक्रमक होत आहे. या स्थितीत काही नेते राजकारण करत असल्याच्या टीका करत आहेत. आज सत्तेत असलेले नेते मराठा समाजाला आरक्षण देण्यापासून चार हात लांब आहेत. तर काही वर्षांआधीचे सत्ताधारी आमची सत्ता असती तर आरक्षण दिलं असल्याचं बोलत आहेत. राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी २०१४ साली राष्ट्रवादीमुळे आम्ही विजयी न झाल्याचं वक्तव्य केलं आहे. यावर आता शिंदे गटाचे नेते संजय शिरसाटांनी प्रत्युत्तर देत पृथ्वीराज चव्हाणांना चांगलेच सुनावले आहे.

संजय शिरसाट काय म्हणाले?
पृथ्वीराज चव्हाणांनी आमची सत्ता असती तर आम्ही आरक्षण दिले असते, असे वक्तव्य केलं आहे. यावर  पलटवार करत शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाटांनी तुम्ही इतक्या वर्षे झोपलेलात का? गोट्या खेळत होता का? तुम्ही मख्यमंत्री होता ना, गेली चाळीस वर्षे मराठा समाज आरक्षणाची मागणी करत आहे, शिंदे सरकारच्या धास्तीमुळे आता हे पोपट बोलायला लागले आहेत, अशी बोचरी टीका संजय शिरसाटांनी  केली आहे.

काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण
२०१४ ला आमचे सरकार राष्ट्रवादीमुळे पडले आहे. आमचे सरकार असते तर मराठा समाजाला आम्हीच आरक्षण दिले असते. माझी खात्री आहे की आमचं सरकार जर पडलं नसतं तर एकत्रित निवडणुकीला सामोरे गेलो असतो. आणि आता भाजपऐवजी आमचे सरकार असते, असे पृथ्वीराज चव्हाणांनी वक्तव्य केलं आहे. 

लॉरेन्स बिष्णोई गँगकडून सलमान खानला पुन्हा धमकी; भाईजानच्या सुरक्षेत वाढ ;

वेध माझा ऑनलाइन। बॉलिवूडचा भाईजान सलमान खानला पुन्हा एकदा लॉरेन्स बिष्णोई  गँगकडून धमकी मिळाली आहे. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने पुन्हा धमकी दिल्याने भाईजानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी सलमानला Y+ सुरक्षा दिली आहे.

फेसबुक पोस्ट शेअर करत सलमानला धमकी
रविवारी बिश्नोईने फेसबुक पोस्टच्या माध्यमातून गिप्पी ग्रेवालच्या कॅनडातील निवासस्थानाबाहेर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी घेतली होती. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, फेसबुक पोस्ट करणारा हा भारताबाहेरील आहे. पोस्ट शेअर करत त्याने लिहिलं होतं की,"तुम्ही सलमान खानला तुमचा भाऊ मानता, पण आता वेळ आली आहे की तुमचा ‘भाऊ’ येऊन तुम्हाला वाचवेल. हा संदेश सलमान खानसाठीही आहे - दाऊद तुम्हाला वाचवेल अशा भ्रमात राहू नका.. तुम्हाला कोणीही वाचवू शकणार नाही".

पोस्टमध्ये पुढे लिहिलं आहे,"सिद्धू मूसवालाच्या मृत्यूबद्दलच्या तुझ्या नाट्यमय पोस्टने कोणाचं लक्ष वेधून घेतलेलं नाही. तो कसा होता आणि त्याचे गुन्हेगारी संबंध होते हे आम्हा सर्वांना माहीत आहे. तुम्ही आता आमच्या रडारवर आहात. हा ट्रेलर आहे, लवकरच सिनेमा प्रदर्शित होईल. . तुम्हाला पाहिजे असलेल्या कोणत्याही देशात पळून जा, पण लक्षात ठेवा, मृत्यूला  निमंत्रण देण्याची गरज नसते". 

गॅंगस्टार लॉरेन्स बिश्नोईने भाईजानला दिलेली जीवे मारण्याची धमकी
सलमानला गेल्या काही दिवसांपूर्वी गॅंगस्टार लॉरेन्स बिश्नोईने जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर त्याला एक धमकीचा ई-मेल पाठवण्यात आला होता. यात लिहिलेलं होतं की, प्रकरण मिटवा, समोरासमोर बोलायचं असेल तर सांगा. वेळीच कळवलं आहे. पुढच्या वेळी झटका बसेल". 

गिप्पी ग्रेवाल म्हणाला,"माझी आणि सलमानची मैत्री नाही. कोणाचा राग कोणावर काढला जात आहे. मौजानाच्या ट्रेलर लॉंचदरम्यान सलमान खान भेटला होता. या सिनेमाच्या निर्मात्याने मला ट्रेलर लॉंचला आमंत्रित केलं होतं. त्याआधी बिग बॉसच्या सेटवर तो भेटला होता. माझे कोणाशीही वैर नाही त्यामुळे या प्रकरणात कोणाचा हात असू शकतो याची कल्पनाही करू शकत नाही".

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेमका कुणाचा? निवडणूक आयोगात आज महत्वाची सुनावणी ;


वेध माझा ऑनलाइन। : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेमका कुणाचा याबाबत आज निवडणूक आयोगात सुनावणी पार पडेल. निवडणूक आयोगात आपली बाजू मांडण्यासाठी शरद पवार गटाचा आजचा शेवटचा दिवस असेल. यानंतर गुरुवारपासून अजित पवार गट आपली भूमिका मांडणार आहे. यापूर्वी शरद पवार गटाच्या वतीने अजित पवार गटाने खोटी कागदपत्र सादर केलीय, राष्ट्रीय कार्यकारणी सहभागी सदस्यांची खोटी माहिती दिली, असे आरोप करत कायदेशीर कारवाई करत तत्काळ गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी केली होती. त्यामुळे आजची सुनावणी महत्वाची असणार आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस कोणाची यासंदर्भात महत्त्वाची सुनावणी आज निवडणूक आयोगात होणार आहे. दुपारी 4 वाजता निवडणूक आयोगात ही सुनावणी पार पडण्याची शक्यता आहे. यामध्ये राष्ट्रवादी नेमकी कोणाची याबाबत निवडणूक आयोग दोन्ही गटांचे म्हणणे ऐकून घेईल. त्यामुळे या सुनावणीकडे संपूर्ण राज्यासह देशाचे लक्ष लागले आहे. 

यापूर्वी शिवसेना कोणाची याबाबत निवडणूक आयोगात बऱ्याच दिवस सुनावणी चालली होती. आता त्याचप्रमाणे राष्ट्रवादी कोणाची याबाबतचा लढा निवडणूक आयोगात जाऊन पोहचला आहे. त्यामुळे यावर सुनावणी घेण्यात येत आहे. यावेळी अजित पवार गट आणि शरद पवार गट दोन्हीकडून मोठ्या प्रमाणात पुरावे सादर करण्यात आले आहे. मात्र, अजित पवार गटाकडून सुमारे 20 हजार बोगस शपथपत्रकं दाखल करण्यात आल्याचा आरोप गेल्या सुनावणीवेळी शरद पवार गटाने केला होता. त्यामुळे यावर आजच्या सुनावणीत काही निर्णय येतो का? हे पाहणं महत्वाचे असणार आहे. सोबतच शरद पवार यांना राष्ट्रवादी पक्ष मिळणार की अजित पवार यांना याकडे संपूर्ण महाराष्ट्रसह देशाचे लक्ष लागलं आहे. 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाहीर सभेतून शिवीगाळ ; पोलिसात गुन्हा दाखल ;

वेध माझा ऑनलाइन। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाहीर सभेतून शिवीगाळ केल्याप्रकरणी शिवसेना उबाठा गटाच्या माजी महापौर दत्ता दळवी यांच्यावर भांडुप पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भूषण पलांडे यांच्या तक्रारीनंतर भांडुप पोलिसांनी माजी महापौर दत्ता दळवी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय.  भा.द.वी कलम 153(अ),153 (ब),153(अ)(1)सी,294, 504,505(1)(क) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी हा दुसरा गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणी भांडुप पोलिस अधिक तपास करत आहेत.

 शिवसेना उबाठा गटातर्फे रविवारी भांडुपमध्ये ईशान्य मुंबईत राहणाऱ्या कोकणवासियांचा जाहीर मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावापुढे राजस्थान प्रचारावेळी लावण्यात आलेल्या 'हिंदुह्रदयसम्राट' या उपमेवरून माजी महापौर दत्ता दळवी यांनी शिवीगाळ केली. सार्वजनिक सभेत संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीबद्दल अश्लील शिवीगाळ व अपमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे उपविभागप्रमुख भूषण पालांडे यांनी भांडुप पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. त्यानुसार भांडुप पोलिसांनी माजी महापौर दत्ता दळवी यांच्या विरोधात भा.द.वी कलम 153(अ),153 (ब),153(अ)(1)सी,294, 504,505(1)(क) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

शिवसेना उबाठा गटातर्फे रविवारी (२७ नोव्हेंबर) भांडुपमधील ईशान्य मुंबईत राहणाऱ्या कोकणवासियांचा जाहिर मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावापुढे राजस्थान प्रचारावेळी लावण्यात आलेल्या 'हिंदुह्रदयसम्राट' या उपमेवरून माजी महापौर दत्ता दळवी  यांनी जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी  शिवीगाळ केल्याचाही आरोप करण्यात आला.  दत्ता दळवी यांनी जाहीर सभेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवीगाळ केली.  यावरून  शिंदे गटाचे नेते तसेच कार्यकर्ते आक्रमक झाले. संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीबद्दल अपमानकारक वक्तव्य केलं, असा आरोप करत शिंदे गटाने पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार, दत्ता दळवी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिस याप्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

संसदेच्या अधिवेशनात ओबीसी विधेयक येणार ? केंद्र सरकार मांडणार महत्वाची विधेयके ;

वेध माझा ऑनलाइन। एनडीए सरकारच्या सलग दुसऱ्या कार्यकाळात शेवटच्या हिवाळी अधिवेशनात सरकार अनेक विधेयके सादर करू शकते. ती सरकारसाठी २०२४च्या लोकसभा निवडणुकीत महत्त्वाचा मुद्दा ठरू शकतात. त्यात प्रामुख्याने ओबीसी जनगणना किंवा ओबीसी आरक्षणाबाबत विधेयक सादर होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय समान नागरी कायदा, सीएएसह डझनभर विधेयके सरकारच्या अजेंड्यामध्ये समाविष्ट आहेत.

येत्या ४ डिसेंबरपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. अधिवेशनानंतर सरकारला थेट लोकसभेची निवडणूक लढवावी लागणार आहे. समान नागरी कायदा, सीएए, एक देश एक निवडणूक यांसारखे मुद्दे प्रमुख आहेत. काँग्रेस आणि विरोधी पक्ष ज्या जातनिहाय जनगणनेबद्दल बोलत असताना त्याचा भाग म्हणून ओबीसी जनगणना किंवा आरक्षणाबाबत विधेयक सादर होऊ शकते.

काय आहे रणनीती?
महाराष्ट्रात मराठा, हरियाणात जाट, गुजरातमध्ये पटेल आणि राजस्थानात गुर्जर आरक्षणाची मागणी करत आहेत. त्यामुळे भाजपचे जातीय समीकरण बिघडले आहे.
बिहारमध्ये ७५ टक्के आरक्षण लागू झाल्यानंतर आणि महाराष्ट्रात मराठा आरक्षणाची मागणी जोर धरत असल्याने ओबीसींसाठी भाजप निर्णय घेऊ शकते.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात फौजदारी न्याय प्रक्रियेशी संबंधित तीन विधेयके संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर करण्यात येणार आहेत.  
मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांबाबतचे विधेयकही मंजूर केले जाणार आहे. अनुसूचित जमातींशी संबंधित विधेयकही मांडण्याची शक्यता आहे.

छगन भुजबळांनी मुक्ताफळे उधळणे थांबवावे ; ना विखे पाटील यांची टीका ; आणि म्हणाले... पवार साहेब पुन्हा पावसात भिजले...हा शुभशकुन की ,अपशकुन आहे ...हे वेळ ठरवेल;

वेध माझा ऑनलाईन। मराठा आरक्षणाबाबत जरंगे-पाटील यांना आम्ही लेखी स्वरूपात आश्वासन दिले आहे.  छगन भुजबळ हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी आरक्षणावरून वादग्रस्त वक्तव्ये करणे दुर्देवि आहे. मराठा समाज आरक्षण मागतोय, तो त्यांचा अधिकार आहे सरकार त्यांच्यावर सकारात्मक विचार करतय. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यानी स्पष्ट केलय आम्ही कोणाच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही. विनाकरण राईचा पर्वत भुजबळ का करातयत याची माहिती नाही...पण त्यांनी मुक्तफळे उधळणे आता थांबवावे अशी टीका ना विखे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केली

*...तर दूध संघाचे परवाने रद्द करणार*

यावेळी दुध दराबाबत सुरू असलेल्या आंदोलनाबात विचारले असता ते म्हणाले, दूधाला प्रति लिटर किमान 34 रुपये दर दिला पाहिजे.  काही दूध संघ सरकारचा आदेश पाळत नाहीत अशा तक्रारी आहेत. महाराष्ट्रात सध्या 30 टक्के दुधात भेसळ आहे, हे थांबवणे गरजेचे आहे. दुधाच्या भावाबाबत खासगी दुध संघ ऐकणार नसतील तर त्यांचे परवाने रद्द करावे लागतील, असे ते म्हणाले.दरम्यान शरद पवार ठाण्यात पावसात भिजले याबाबत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 2024 साठी हा शुभशकुन असल्याचे म्हटले होते, त्यावर मंत्री विखे- पाटील म्हणाले, प्रत्येकाची विचार करण्याची भूमिका असते. कुणाला वाटतं तो शुभशकुन आहे, कुणाला वाटतं अपशकुनं आहे. काळ ठरवेल काय आहे ते...


महाराष्ट्रात काँग्रेसची वाताहत पृथ्वीराज बाबांमुळे झाली ; ना विखे पाटील यांचा गंभीर आरोप ;

वेध माझा ऑनलाइन। मराठा समाजाला आम्ही आरक्षण दिलं असतं, असे वक्तव्य माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात केल होतं. या वक्तव्याचा समाचार घेताना नामदार  राधाकृष्ण विखे- पाटील यांनी आ पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्रात  काँग्रेसची वाताहत होण्याला पृथ्वीराजबाबाच जबाबदार असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.राज्यातले सरकार देखील त्यांच्यामुळेच गेलं असेही ते म्हणाले.

आज कराड येथे आले असता त्यांचे मोठे स्वागत करण्यात आले. यावेळी मराठा आरक्षणाबाबत बोलताना मंत्री विखे- पाटील म्हणाले, आमचं सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी गंभीर आहे.
याविषयी स्वतः मुख्यमंत्री यांनी 2 जानेवारीपूर्वी आरक्षण देण्यासाठी मुदत मागितली आहे. हिवाळी अधिवेशन सुरू होत असून याविषयी कोणाच्याही मनात कोणतीही शंका असण्याचे आता कारण नाही असे ते म्हणाले

ओबीसीच्या लढ्याचा जनक मीच आहे ; प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्याने खळबळ ;

वेध माझा ऑनलाइन। राज्यात अनेक दिवसांपासून मराठा आणि ओबीसी समाजात आरक्षणाच्या मुद्द्यावरून वाद सुरू आहे. यावेळी या वादात मराठा समाजाने आमदारांचे बंगले देखील जाळले होते, यावर मराठा समाज ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी करत आहे. यामुळे मोठा वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र आता या ओबीसी आरक्षणाच्याबाबतीत बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी छगन भुजबळ यांच्या ओबीसी आरक्षणाबाबत भाष्य केलं आहे. पुण्यात  प्रकाश आंबोडकरांची पत्रकार परिषद होती, यावेळी त्यांनी भुजबळांना बाहेर काढणारा मीच आहे. ओबीसी लढ्याचा जनक मीच असल्याचे वक्तव्य प्रकाश आंबेडकरांनी केलं आहे. यावरून राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

प्रकाश आंबेडकरांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत ओबीसी समाजाच्या आरक्षणाबाबत वक्तव्य केलं आहे. याबाबत अजूनही कोणाला कल्पना नव्हती. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आता मला पुन्हा इतिहास सांगायची गरज नाही. मंडल आयोगाबाबतचा इतिहास पाहा तुम्हाला कळेल. छगन भुजबळांना जेलमधून बाहेर काढणारा मीच आहे. न्यायालयात पलटवार मीच केला. याबाबत त्यांनी माझे कधीच आभार मानले नाहीत. मला कोणत्याही व्यक्तीची गरज नाही. जरा इतिहास सुधारून घ्या, मग कळेल की, ओबीसीच्या लढ्याचा जनक मी आहे. यावेळी त्यांनी राज्यात दंगली कधीही घडू शकतात, असं भाष्य केलं आहे.
सध्याचं राज्यातील वातावरण पाहता अनेकदा राज्यात दंगली घडू शकतात, असे पाहायला मिळते. सरळ प्रश्न आला तर सरळ उत्तर देईल. पण मला जसा प्रश्न येईल, तसं उत्तर मी देणार आहे. एकदा बोललो की बोललो विधान मी कधीच मागे घेणार नाही.  राज्यात सध्या दंगली कधीही घडू शकतात, असे वक्तव्य प्रकाश आंबेडकरांनी केलं आहे.

शरद पवार गटाचं आमदार अपात्रतेवर १० पानी उत्तर ;

वेध माझा ऑनलाइन। राज्यात काही महिन्यांपासून राष्ट्रवादी पक्षांमध्ये दोन गट पडल्याने आमदार अपात्रतेवर काही महिन्यांपासून सुनावणी सुरू होती. मात्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सुनावणीसाठी तारीख पे तारीख घेत होते, मात्र आता आजपासून येत्या पाच दिवसात विधानसभा अध्यक्ष सुनावणीसाठी असणार आहेत. न्यायलयाने अध्यक्षांना जानेवारीपर्यंत राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी आमदार अपात्रतेच्या निकालासाठी वेळ दिला आहे. तर दुसरीकडे शिवसेनेच्या आमदार अपात्रतेसाठी डिसेंबरपर्यंत वेळ देण्यात आला आहे. दरम्यान, आता अजित पवार गटाच्या नेत्यांनी राष्ट्रवादी पक्ष हा आमचाच आहे. अधिक आमदार आमच्याकडे असल्याने खरा राष्ट्रवादी पक्ष हा आमचाच असल्याचे वारंवार बोललं जातंय. 

यावर नार्वेकरांनी अजित पवार गट आणि शरद पवार गटाला आपापली बाजू मांडण्यासाठी वेळ दिला आहे. यावर अजित पवारांनी पक्ष आमचाच असल्याचा दावा २६० पानी उत्तरात केला आहे. राष्ट्रवादीचे नेते प्रतोद अनिल पाटील हे आमच्या गटात आहेत, यामुळे खरी राष्ट्रवादी आमचीच असून अध्यक्षांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असा अजित पवार गटाचा दावा आहे.

शरद पवार गटाचं आमदार अपात्रतेवर १० पानी उत्तर
विधिमंडळातून शरद पवार गटातील आमदारांना नोटीस बजावण्यात आली होती. या नोटीसीला शरद पवार गटाच्या आमदारांनी १० पानी उत्तर दिलं आहे. यावर आता अध्यक्ष नार्वेकर काय भूमिका घेतील हे पाहणं महत्वाचे असणार आहे.  अशातच आता राष्ट्रवादी पक्षाची आमदार अपात्रता सुनावणीची अंतिम तारीख ही ३१ जानेवारी असणार आहे. तर शिवसेना पक्षाची सुनावणी ही ३१ डिसेंबर असणार आहे. अशातच अजित पवार गटाने भाजप आणि शिंदे गटासह हातमिळवणी केली असून उपमुख्यमंत्री पदाचे दावेदार झाले आहेत. यानंतर त्यांनी राष्ट्रवादी आमचीच असून पक्षाच्या घड्याळ चिन्हावर दावा केला आहे. अजित पवार गटाच्या या भूमिकेवर शरद पवार गटानेही निवडणूक आयोगात धाव घेतली आहे. यावर पुढं काय घडणार आहे हे पाहणं उत्सुकतेचं राहणार आहे.

Monday, November 27, 2023

आपल्या देशातील ८० कोटी जनता ऐतखाऊ; रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांचे धक्कादायक विधान ;

वेध माझा ऑनलाइन। आपल्या देशातील ८० कोटी जनता ही ऐतखाऊ असल्याचे धक्कादायक वक्तव्य रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी केले आहे. या लोकांची रेशन व्यवस्था बंद करून देशाला बलशाली करावे असेही ते म्हणाले आहेत. रविकांत तुपकरांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी खोत बुलढाण्यात आले होते. 

शेतीवर अवलंबून असलेला आता ४० टक्केच समाज उरला आहे. देशात ८० कोटी लोक आयते बसून खात आहेत. यामुळे या लोकांची रेशन व्यवस्था बंद करावी, अशी मागणी खोत यांनी केली आहे. जर एवढी माणसे आयते खात असतील तर हा देश भिकाऱ्यांचा आहे. माणसांना भिकारी बनविण्याचे काम सुरु असे असे खोत म्हणाले आहेत. 

सर्वांना फुकट वाटण्याची राजकीय पक्षांमध्ये स्पर्धा लागली आहे. हे फुकट, ते फुकट असे करता करता भिकाऱ्यांचा देश बनत चालला आहे. प्रत्येकाने कष्ट करावेत, त्यातूनच देश बलशाली होईल असेही खोत म्हणाले. 

महत्वाचे म्हणजे गरीबांना रेशन देण्याची महत्वाकांक्षी योजना मोदी सरकार राबवित आहे. काँग्रेसनेही यापूर्वी या योजना राबविल्या आहेत. परंतू, मोदी सरकारने या धान्यात वाढ केली आहे. य़ा योजनेला मोदी सरकार प्रचाराचा मुद्दा बनवत असताना भाजपाप्रणित युतीत असूनही खोत यांचे असे वक्तव्य चर्चेचा विषय ठरले आहे. 

सदाभाऊ खोत यांनी यापूर्वीही अनेकदा वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. टोमॅटो मिळाला नाही म्हणून कोणी मेलं का? असा सवालही खोत यांनी विचारला होता. राज्यकर्ते हे रेड्यांची औलाद, शरद पवारांना सैतान म्हणत त्यांना आता गोळ्या घालणार का, असेही खोत म्हणाले होते.

भुजबळांची गाडी फोडणार ; स्वराज्य संघटनेचा इशारा ;

वेध माझा ऑनलाइन। राज्यात मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणावरून चांगलेच वातावरण तापले आहे. या आरक्षणाच्या मुद्द्यावरून काही दिवसांपासून रान पेटलं आहे. मात्र आरोप-प्रत्यारोप सुरूच असून मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात सामावून घेण्याची मागणी आहे. ओबीसी समाज आणि नेते छगन भुजबळ मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समावून घेत नाहीत. गेल्या काही दिवासांपासून मराठा समाजाविरोधात छगन भुजबळ वक्तव्य करत आहेत. याला प्रत्युत्तर म्हणून मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील  भुजबळांवर टीका करत आहेत. यामुळे आता भुजबळांना स्वराज्य संघटनेनं गाडी फोडण्याचा इशारा दिला आहे. यामुळे आता आरक्षणाच्या मुद्द्याला वेगळं वळण लागलं आहे

गाडी फोडण्याचा भुजबळांना इशारा 
आधी जालना आणि आता हिंगोली येथे ओबीसी नेते छगन भुजबळांनी ओबीसी एल्गार महासभा घेतल्या. या सभेत छगन भुजबळांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यापासून विरोध दर्शवला आहे. यावरून आता छगन भुजबळांना स्वराज्य संघटनेचे सरचिटणीस धनंजय जाधव यांनी गाडी फोडण्याचा इशारा दिला आहे. धनंजय जाधव म्हणाले की, वेळ पडली तर भुजबळांची गाडी इथेही फुटू शकते. ओबीसी नेत्यांना विनंती आहे की त्यांनी आमच्या आरक्षणाला नख लावू नये. छगन भुजबळ हे वारंवार वक्तव्य करत दोन्ही समाजात वाद लावत आहेत. त्यांनी वेळीच थांबावं, असं म्हणत स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी इशारा दिला आहे.
दरम्यान, स्वराज्य संघटनेच्या शासकीय विश्रामगृहावर जात घोषणाबाजी केल्यानंतर भुजबळांचे पुतणे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते समीर भुजबळ छगन भुजबळांच्या भेटीला पोहोचले असता, स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांची भेट घेत शासकीय विश्रामगृहात जाऊन स्वराज्य संघटनेच्या आंदोलनाविषयी विचारलं असता मला याची काही माहीती नसल्याची प्रतिक्रीया दिली आहे.
सरकारने मराठा समाजाला तात्पुरता आरक्षणाचा मुद्दा सोडवण्यासाठी प्रयत्न केला. त्यानंतर भुजबळांनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात आरक्षण मिळवून देण्यासाठी विरोध केला. मराठा समाजाला ओबीसी प्रमाणपत्र देणे म्हणजे ओबीसी समाजावर अन्याय करण्यासारखे असल्याचे छगन भुजबळ यांचे म्हणणं आहे. 

Sunday, November 26, 2023

जरांगेंची भेट घेतली म्हणून रोहित पवार आणि संदीप क्षीरसागर यांच्यावर भूजबळ भडकले : काय आहे बातमी?

वेध माझा ऑनलाइन | बीडमध्ये क्षीरसागर यांचे घर जाळले. त्यांचे कुटुंब थोडक्यात वाचले. त्यांचे दु:ख समजून घेण्यासाठी मी त्यांच्या घरी गेलो. तेव्हा क्षीरसागर म्हणाले की कामानिमित्त मी संभाजीनगरला आलो आहे. मात्र मी नंतर बघितले तर रोहित पवार हे संदीप क्षीरसागरांना घेऊन जरांगेंना भेटायला गेले होते... आमचे घर अर्धच का जाळले.. म्हणून जरांगेंची माफी मागण्यासाठी गेला होतात का ? असा बोचरा सवाल विचारत मंत्री छगन भुजबळांनी संदीप क्षीरसागर  यांच्यावर निशाणा साधला.

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आज हिंगोली येथे दुसरा ओबीसी एल्गार मेळावा पार पडला. या मेळाव्यातून छगन भुजबळ यांनी संदीप क्षीरसागर यांच्यावर टीकास्त्र सोडले. तसेच मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांना देखील शेलक्या शब्दांत सुनावले.

मनोज जरांगे यांच्यावर निशाणा साधताना भुजबळ म्हणाले, मराठा समाजाचे आता एक नवीन नेते तयार झाले आहेत. ते म्हणतात, लायकी नसणाऱ्या लोकांच्या हाताखाली आम्हाला काम करावे लागत आहे. म्हणजे ओबीसी, एससी, एसटींची लायकी नाही का? शिवाजी महाराजांच्या सैन्यात बहुजन समाजातील लोक होते.त्यांची लायकी नव्हती म्हणून त्यांनी शिवरायांना साथ दिली का. अनेक संत वेगवेगळ्या बहुजन जातीतील होऊन गेले.त्यांची लायकी होती की नाही, असा सवाल भुजबळ यांनी केला.

भुजबळ म्हणाले, झुंडशाही खपवून घेणार नाही. मराठा समाजाला किंवा मराठा आरक्षणाला माझा विरोध नाही.मात्र ओबीसींच्या हक्काच्या आरक्षणात मराठ्यांचा समावेश करू नका, ही आमची मागणी आहे.

आरक्षणाचा सर्वाधिक फायदा मराठ्यांना ; मोदींनी दिलेल्या 10 टक्के आरक्षणात 85 टक्के मराठे ; 15.50 टक्के IAS तर 28 टक्के IPS; ओबीसी मेळाव्यात भुजबळांनी सादर केली आकडेवारी ;

वेध माझा ऑनलाइन। ज्या मराठा समाजाला आरक्षण नाही असं म्हणता त्या मराठा समाजालाच आरक्षणाचा सर्वाधिक फायदा झाला असून मोदींनी दिलेल्या 10 टक्के आरक्षणामध्ये 85 टक्के जागा या मराठा समाजाला मिळाल्या असल्याचा थेट आरोप राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी केला. केंद्रीय लोकसेवेच्या आएएसमध्ये 15.50 टक्के तर आयपीएसमध्ये 28 टक्के मराठा समाजाचे लोक असल्याची आकडेवारीही भुजबळांनी मांडली.  हिंगोलीमध्ये ओबीसी एल्गाल महासभेत बोलताना छगन भुजबळांनी मनोज जरांगेंवर टीका करताना ही आकडेवारी समोर मांडली. 

काय म्हणाले छगन भुजबळ? 
राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, इतरांना दिलेल्या आरक्षणाचा सर्वाधिक फायदा हा मराठा समाजाला झाला आहे. मोदी सरकारने दहा टक्के आरक्षण दिलं, पण त्यामध्ये 85 टक्के जागा या मराठा समाजाला मिळाल्या उरलेल्या 40 टक्के जागांमध्ये मराठा समाजालाच जागा मिळाल्या.
आमच्या 27 टक्के आरक्षणामध्येही मराठा समाज आहे. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण नसतानाही सर्वाधिक फायदा मिळतोय. 

भुजबळांनी सांगितलेली आकडेवारी
ईडब्ल्यूएस मध्ये 78 टक्के मराठा समाजाला आरक्षण मिळालं. 

मराठा समाजाला लोकसेवा आयोगातील प्रतिनिधित्व... 
ए ग्रेड - 33.50 टक्के 
बी ग्रेड - 29 टक्के
सी ग्रेड - 37 टक्के
डी ग्रेड - 36  टक्के
IAS - 15.50 टक्के 
IPS - 28 टक्के 
IFS - 18 टक्के 

मंत्रालय कॅडरमध्ये 
ए ग्रेड - 37.50 
बी ग्रेड - 52.30
सी ग्रेड - 52
डी ग्रेड - 55.50 टक्के
गेल्या वर्षभरात झालेल्या 650 नियुक्त्यांपैकी 85 टक्के नियुक्त्या या मराठा समाजाला मिळाल्या आहेत असं छगन भुजबळानी सांगितलं. 

मराठा समाजाला आर्थिक मदतही मिळाली
मराठा समाजाला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून ओबीसींपेक्षा जास्त फायदा झाल्याचं छगन भुजबळ म्हणाले.

ते म्हणाले की, मराठा समाजामध्ये गरीब आहेत, आमचा त्यांना विरोध नाही, पण त्यांना आताही आरक्षणाचा लाभ मिळतोय. अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाच्या माध्यमातून 70 हजार लाभार्थ्यांना 5160 कोटी रुपये देण्यात आले. ओबीसींना अद्यापही तेवढे देण्यात आले नाहीत. राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती, पंजाबराव देशमुख महामंडळाच्या माध्यमातून देखील मराठा समाजाला मदत मिळल्याचेही ते म्हणाले

गेल्या २ महिन्यातील कुणबी प्रमाणपत्रांना स्थगिती द्या; छगन भुजबळांनी केली मोठी मागणी ; भुजबळ म्हणाले...होऊ द्या जनगणना...मग कोणाची ताकद किती आहे...ते कळेल... ;

वेध माझा ऑनलाईन। एकच पर्व, ओबीसी सर्व...आपापसातील मतभेद बाजूला ठेवा. भुजबळांना बोलवा नाहीतर नका बोलवू, ओबीसींचा आवाज बुलंद करा. मी देशात अनेक ठिकाणी सभेचं नेतृत्व केले. आमदारकी, मंत्रिपदाची हौस नाही. गरीब मराठा समाजाला वेगळे आरक्षण द्या पण आमच्यावर बुलडोझर चालवू नका असे मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. दरम्यान, होऊ द्या जनगणना, मग कोणाची किती ताकद आहे हे कळेल असंही भुजबळांनी यावेळी म्हटलंय. 

मंत्री छगन भुजबळांनी हिंगोलीच्या सभेत विविध मागण्या केल्या. जे मराठा समाजाच्या सारथीला मिळाले ते ओबीसी, महाज्योतीलाही हवं, मराठा समाज मागास नाही असं सुप्रीम कोर्टाने सांगितले मग शिंदे समिती ताबडतोब बरखास्त करा, गेल्या २ महिन्यातील कुणबी प्रमाणपत्रांना स्थगिती द्या, निरगुडे आयोग, ओबीसी आयोग यांना काहीही आदेश असले तरी मराठा समाजाचे मागासलेलेपण सिद्ध करा. सर्वांचे सर्वेक्षण करा. एका समाजाचे सर्वेक्षण कसे होणार, कुठला समाज मागे आहे, कुठला समाज पुढे आहे याची तुलना झाली पाहिजे. सर्व जातीचे सर्वेक्षण करून कोण मागासलेले आहे आणि कोण पुढारलेले आहे.बिहारनं जनगणना केली ६३ टक्के आढळले, भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे, शरद पवार, अजित पवार, राहुल गांधी सगळेच सांगतायेत जनगणना करा. होऊ द्या जनगणना, मग कोणाची किती ताकद, लोकसंख्या किती हे कळेल. बिहार करू शकते तर महाराष्ट्र का करू शकत नाही. जे होईल ते मान्य करायला आम्ही तयार आहोत असं भुजबळांनी म्हटलं. 

तसेच आमचा मराठा समाजाला विरोध नाही. त्यांना आरक्षण द्या पण वेगळे द्या. २ वेळा कायदा आला आम्ही समर्थन दिले. मराठा समाजाला विरोध नाही तर जाळपोळ करणाऱ्या झुंडशाहीला विरोध आहे. उपोषणकर्त्यासोबत राहणारा बेद्रेसह ३-४ जणांना पकडले. पोलिसांच्या एफआयआरनुसार, बेद्रेकडे पिस्तुलातील गोळ्या सापडल्या. उपोषणस्थळी ज्या पुंगळ्या सापडल्या त्या पिस्तुलच्या होत्या हे सुद्धा दाखवतायेत. २४ तासात त्याला न्यायालयीन कोठडी मिळाली. ज्याच्यावर आरोप आहे हे त्यांनी केले. ७० पोलिसांना जखमी केले. त्याला चौकशीसाठीही ठेवणार नाही.एखाद्या पोलिसाला धक्का मारला तर ८ दिवस जेलमध्ये ठेवतील. पिस्तुल सापडले, गोळ्या झाडलेले सिद्ध झाले तरीही सोडले जाते असा आरोप भुजबळांनी केला. 

दरम्यान, मला १९३१ चा वर्तमानपत्रातला कागद सापडला, त्यात मराठा बंधूस सूचना, २६ फेब्रुवारी १९३१ रोजी जनगणना होईल. त्यावेळी आपली जात मराठा असे स्पष्टपणे गणतीदारास सांगावी, कुणबी, मराठी सांगू नये. काही मराठा लोक धंद्यावरून जाती सांगतात. त्यांनी धंद्याची जात न सांगता मराठा जात सांगावी. जाणत्या मराठ्यांनी अज्ञानी मराठ्यास ते सांगावे. गणतीदार ते लिहून घेतात की नाही हे सांगावे असा उल्लेख आहे. तेजस्विनी चव्हाण या ताई सांगतायेत, आम्ही जातीवंत मराठा आहे, आम्हाला वेगळे आरक्षण द्या त्यांनाही धमक्या सुरू झाल्या. सगळेच कुणबी झाले तर राज्यात मराठा कुणीच नाही...? असा सवालही भुजबळांनी केला.

Saturday, November 25, 2023

आतापर्यंत 32 लाख नोंदी सापडल्या, मग मराठा आणि कुणबी वेगळे कसे? आम्ही OBC आरक्षणच घेणार; मनोज जरांगेंचा निर्धार ;

वेध माझा ऑनलाइन।आतापर्यंत मराठा आरक्षणासाठी अनेक आंदोलनं झाली, आरक्षण टप्प्यात आलं असं दिसत असताना अचानक ते मिळत नाही अंस अनेकदा झालं, या सगळ्यांचा अभ्यास केला आणि अंतरवाली सराटीमध्ये आंदोलन सुरू केलं, आता 32 लाख नोंदी सापडल्यानं ते यशस्वी होताना दिसत आहे असं मनोज जरांगे म्हणाले. कुणबीच्या नोंदी सापडत असताना आता मराठा आणि कुणबी वेगळे कसे काय असू शकतात असा प्रश्नही त्यांनी विचारला. त्यामुळे मराठ्यांना ओबीसीमधूनच आरक्षण मिळवून देणार असल्याचा ठाम निर्धारही त्यांनी व्यक्त केला. 

मराठा आणि कुणबी हे वेगवेगळे कसे काय असा सवाल मनोज जरांगे यांनी केला. मराठा म्हणून वेगळा प्रवर्ग केला तर ते आरक्षण टिकणार नाही. गेल्या वेळी ईएसबीसी आरक्षण दिलं, ते कोर्टात टिकलं नाही, त्यामुळे ओबीसीमधूनच दिलेलं आरक्षण टिकेल. आम्ही पहिल्यापासूनच ओबीसीमध्ये आहोत, आता नोंदीही सापडत आहेत, मग आरक्षण द्यायला काय अडचण आहे असं मनोज जरांगे म्हणाले. 

मराठा आरक्षणासाठी गेल्या तीस चाळीस वर्षांपासून प्रयत्न सुरू आहे, पण प्रत्येकवेळी आरक्षण टप्प्यात दिसतं आणि जवळ आलं की हुकतं असं जरांगे म्हणाले. ते म्हणाले की, आतापर्यंतची आंदोलनं ही का फुटली आणि बंद झाली याचा अभ्यास केला. त्यानंतर आता आंदोलन केलं आणि हे आतापर्यंत 80 टक्के यशस्वी झाल्याचं दिसून येतंय. आतापर्यंत 32 लाख नोंदी सापडल्या, म्हणजे 32 लाख घरांमध्ये याचा फायदा झाला त्यामुळे हे आंदोलन यशस्वी झाल्याचं मानतो. या आधी 1967 नंतरच्या नोंदी घेतल्या जायच्या, आता 1805 पासूनच्या नोंदी तपासल्या जात आहेत. आता 24 डिसेंबर रोजी सरसकट आरक्षण घेणार.

आंतरवाली सराटीमध्ये सुरू असलेल्या आंदोलनावर पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर याकडे सर्वांचं लक्ष गेलं. पण जर हा लाठीचार्ज झालाच नसता तर काय झालं असतं असा प्रश्न विचारल्यानंतर जरांगे म्हणाले की, आम्ही ठरवलंच होतं की काहीही झालं तरी आरक्षण घ्यायचं, आंदोलन सोडायचं नाही. 123 गावांचा त्यामध्ये सहभाग होता. 

स्वतंःला गरीब म्हणवता आणि जेसीबीमधून फुलांची उधळण केली जाते असा जरांगेवर आरोप केला जातोय. त्यावर जरांगे म्हणाले की, फुलं आमची आहेत, त्यांच्या का पोटात दुखतंय. आजकाल एखाद्या आमदाराने खांद्यावर हात ठेवलं तरी पोरगं दुसऱ्या दिवशी कुणाशी धड बोलत नाही असं म्हणत जरांगे म्हणाले की, आंदोलन हे समाजासाठी आहे, समाजासोबत गद्दारी नाही. त्यामुळे काहीही झालं तरी आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटायचं नाही असं ठरवलं आहे.

भुजबळ नवा पक्ष काढणार ? ; एका मुलाखतीत दिले संकेत ; मंत्रिपदाचा राजीनामा देणार ?

वेध माझा ऑनलाइन। सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत आहे. मंत्री छगन भुजबळ ओबीसींसाठी नवीन पक्ष स्थापन करणार आहेत. भुजबळांनी दिलेल्या एका मुलाखतीत तसे संकेत दिले आहेत. याबाबतचे वृत्त एका न्यूज पोर्टल ने प्रसिद्ध केले आहे

स्थानिक अधिकाऱ्यांवर दबाव टाकून कुणबी प्रमाणपत्र दिले जात आहेत, असा आरोपही भुजबळांनी यावेळी केला. मराठा आरक्षणावर आपली नेमकी भूमिका काय आहे आणि तोडगा काय अशा अनेक प्रश्नांवर भुजबळांनी स्पष्ट मते व्यक्त केली आहेत. एका मुलाखती दरम्यान ही माहिती भुजबळांनी दिली आहे. माझा मराठा आरक्षणाला विरोध नाही. पण मराठा समाजाला मागच्या दाराने ओबीसी कॅटेगरीत आरक्षण देण्याचा घाट घातला जातोय. स्थानिक अधिकाऱ्यांना धमक्या दिल्या जाताहेत. मूळ कागदपत्रांमध्ये बदल केले जात आहेत. सरसकट प्रमाणपत्र देण्यासाठी अधिकाऱ्यांना फोन केले जात आहेत. राज्यात एक समांतर सरकार चालवले जात आहे, असा आरोप भुजबळांनी केला आहे.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना राज्यात काय चालले आहे याची पूर्ण कल्पना आहे, असेही ते म्हणाले. ओबीसी समाजासाठी मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची तयारी भुजबळांनी दाखवली आहे. तसेच आगामी काळात ओबीसींसाठी वेगळा पक्ष काढण्याचे संकेतही भुजबळांनी दिले आहेत. आपण मराठा आरक्षणाच्या विरोधात नाही, पण आपण झुंडशाहीच्या विरोधात आहोत असे भुजबळ यांनी सांगितले आहे.

स्व चव्हाणसाहेबांच्या कराड येथील समाधीस्थळी सुप्रिया सुळे झाल्या नतमस्तक ; 39 व्या पुण्यस्मरण दिनानिमित केले अभिवादन ;

वेध माझा ऑनलाइन। भारताचे माजी उपपंतप्रधान, नवं महाराष्ट्राचे शिल्पकार,  राज्याचे पहिले मुख्यमंत्री आदरणीय स्व.यशवंतरावजी चव्हाणसाहेब यांच्या ३९ व्या पुण्यस्मरणदिनानिमित्त त्यांच्या कराड येथील प्रीतीसंगम या समाधीस्थळी माननीय खासदार सुप्रियाताई सुळे, राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री माननीय आमदार बाळासाहेब पाटील व खासदार श्रीनिवास पाटील यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.

याप्रसंगी सातारा जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष सुनील माने, देवराजदादा पाटील, मानसिंगराव जगदाळे, सारंग पाटील, सौ.संगीता साळुंखे(माई), नंदकुमार बटाणे, पोपटराव साळुंखे, गंगाधर जाधव, पांडुरंग चव्हाण तसेच सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याचे आजी-माजी संचालक, कराड नगर परिषदेचे आजी-माजी नगरसेवक व इतर मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

किडनी ७५ हजार, लिव्हर ९० हजार, डोळे २५ हजार; कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्यांवर अवयव विक्रीची वेळ ; काय आहे बातमी ?

वेध माझा ऑनलाइन। भारत हा कृषिप्रधान देश आहे असे आपल्याला शाळेत असताना शिकवले असून ते खरे आहे. मात्र याच कृषिप्रधान देशात शेतकरी दररोज आत्महत्या करत आपला जीव गमावून बसत आहेत. यावेळी त्याचे कुटुंब निराधार होत असून सरकार मात्र डोळ्यावर कापड ओढून निवांत झोपले असल्याने शेतकरी बांधव त्रस्त झाले आहेत. अशातच आता राज्यातील हिंगोली जिल्ह्यातील सोनगाव तालुक्यात एक नाही, दोन नाही तर आता १० शेतकरी बांधवांनी कर्जाला कंटाळून डोळे, किडनी, लिव्हर तसेच इतर अवयव विकत घ्या अशी मागणी निवेदनाद्वारे थेट मुख्यमंत्र्यांना केली आहेत.

सोयाबीन आणि कापसाला भाव नाही. पिक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना देण्यात आली नाही. कर्ज फेडण्यासाठी पैसे कुठून आणायचे. यासाठी किडनी ७५ हजार, लिव्हर ९० हजार, डोळे २५ हजारात विक्रीसाठी काढल्याचे शेतकरी म्हणाले आहेत. यंदा मराठवाड्यात अपेक्षित पाऊस झाला नसल्याने गंभीर परिस्थिती झाली आहे. खरीप हंगामातील पिकांंमध्ये घट झाल्याने सर्व अवघड होऊन बसलं आहे. अशा स्थितीतही सरकार कोणतेही पाऊल उचलायला मागत नाही. कोणताही लाभ मिळत नसल्याचा आरोप होत आहे. सोयाबीन, कपाशी सारख्या पिकांना योग्य भाव दिला जात नाही. यामुळे आता शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

अनेक शेतऱ्यांनी सावकराचे कर्ज, बॅंकेचे कर्ज, खाजगी कर्ज, उसने पैसे घेऊ केलेल कर्ज फेडण्यासाठी खरीप हंगामात पेरण्या केल्या आहेत. अपेक्षित पाऊस न झाल्याने आणि पावसाचा खंड पडल्याने सोयाबीन पिक अक्षरश: उध्वस्त झाले आहे. यावर शेतकऱ्यांनी आमचे अवयव विक्रीला करणार असल्याचा निर्णय घेतला आहे

यावेळी शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र पाठवून निवेदन केलं आहे. या निवेदनात बॅंकेचे कर्ज परफेड करण्यासाठी आमचे अवयव खरेदी करून कर्जाची परतफेड करावी, अशी मागणी केली आहे.  यावरून आता राज्यातून नेते मंडळीही सत्ताधारी सरकारवर संतापले आहेत. कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी झोपेचं सोंग घेऊन शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष सरकार करत असल्याचे वक्तव्य केलं आहे.


काय म्हणाले वडेट्टीवार

किडनी – ७५,०००/ १० नग लिव्हर – ९०,०००/ १० नग डोळे – २५,०००/ १० नग. शरीरातील इतर अवयवांचे रेट कार्ड काढून दुष्काळग्रस्त हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबांनी ते सरकारकडे पाठवले आहे.  शेतकरी जर आमदार खासदार असते तर त्यांच्याकरीता खोके देण्याची तयारी या सरकारने त्वरित दाखवली असती. पण दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी सरकारकडे निधी नाही. आम्ही वारंवार सांगत आहोत. पण झोपेचं सोंग घेऊन शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करत आहे?

कराडात स्व यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे समधीस्थळी अभिवादन ;

वेध माझा ऑनलाईन। विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात एकोपा निर्माण करून समाजकारण आणि राजकारण कसे करायचे याची आदर्श मुहूर्तमेढ व शिकवण स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी घालून दिली. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी त्या काळात घेतलेले निर्णय आजही महत्त्वपूर्ण ठरतात. त्यांचे विचार, साहित्य आजही मार्गदर्शक आहेत, असं मत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी व्यक्त केलं.

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या कराडमधील समाधी स्थळावर पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

यावेळी आमदार दीपक चव्हाण, माजी आमदार आनंदराव पाटील, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पोलीस अधीक्षक समीर शेख, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Thursday, November 23, 2023

मराठ्यांचे फलक फाडून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू ; "त्या' मंत्र्याला रोखा नाहीतर जड जाईल ; छगन भुजबळांवरून जरांगे पाटलांनी सरकारला दिला इशारा ;

वेध माझा ऑनलाइन। मराठा आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात आली असून, विजयाचा क्षण जवळ येत असताना आमचे फलक फाडून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱया ‘त्या’ मंत्र्याला सरकारने वेळीच रोखावे, अन्यथा सरकारला जड जाईल, असा गंभीर इशारा मनोज जरांगे-पाटील यांनी छगन भुजबळ यांचे नाव न घेता दिला.                                          

नगर जिल्हा दौऱयावर आलेले मनोज जरांगे-पाटील यांची बुधवारी रात्री संगमनेर येथे, तर आज नेवासा आणि शेवगाव येथे सभा झाली. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाविरोधात बोलणाऱया आणि जाती-जातीत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱयांवर जोरदार हल्लाबोल केला. नेवासा येथील सभेत ऍड. कारभारी वाखुरे यांनी मराठा आरक्षणास विरोध करणारे मंत्री छगन भुजबळ यांच्या निषेधाचा ठराव मांडला. हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.

जरांगे पाटील म्हणाले, ‘आत्तापर्यंत मराठय़ांना आरक्षण समजू दिले नाही. 70 वर्षांपूर्वीच मराठा समाजाला आरक्षण मिळाले असते, तर त्याचा मोठा फायदा समाजाला झाला असता, मराठा समाजाची मुले आयएएस, आयपीएससारख्या मोठय़ा पदांवर गेले असते. त्यांना घरी बसावे लागले नसते. मात्र, जाणून-बुजून समाजाला आरक्षण दिले गेले नाही. 70 वर्षे षड्यंत्र रचले गेले. पुरावे बुडाखाली दाबून ठेवले गेले. पुरावे नाही म्हणणारे हे नेते कोण, हे समजायला हवे. आरक्षणासाठी मराठा समाज एकवटल्यानंतर आता सरकारमध्ये हालचाली सुरू झाल्या. सरकारसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. मराठा समाज मागास असल्याचा अहवाल दिला गेला; मात्र आरक्षण दिले गेले नाही.’

आत्तापर्यंत तीन वेळा मराठा समाज आरक्षणापासून हुकला. 1805 पासूनच्या नोंदी सापडल्या आहे, तरी आरक्षण दिले गेले नाही. ओबीसीसह इतर समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी कधीही मराठा समाजाने विरोध केला नाही. मात्र, आता आरक्षणासाठी मराठा समाज एकवटल्यानंतर विरोध होताना दिसत आहे. मराठय़ांनी 70 वर्षांत अनेक पक्ष मोठे केले, आपले नेते मोठे केले. गरज पडेल, तेव्हा ते मदत करतील असे वाटत होते. मात्र, आज मराठा समाजाच्या मागे कोणीही उभा राहिला नाही, अशी खंत व्यक्त केली.

मराठा समाजाची आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात येत असताना, राजकीय शक्तीने षडयंत्र रचून ती लढाई अयशस्वी केलेली आहे. आता सरकारने 24 डिसेंबरपर्यंत शब्द दिलेला असताना फलक फाडणारे, आरक्षणास विरोध करणारे मराठा समाजाला उचकविण्याचा प्रयत्न करीत आहेत. जातीय तेढ निर्माण करीत असून, त्यांनी चिल्लर चाळे बंद करावेत. सरकारने त्या मंत्र्याला वेळीच न आवरल्यास सरकारला जड जाऊ शकते, असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला. दरम्यान, 1 डिसेंबरपासून पुन्हा जोमाने साखळी उपोषणे सुरू करा. माझा जीव गेला तरी मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मागे हटणार नाही. तुमच्या पाठिंब्याशिवाय मी काहीही करू शकत नाही. तुम्ही एकजूट राखा, असे आवाहन त्यांनी केले.

विधानसभा अध्यक्षांनी सांगून टाकले... म्हणाले ; आमदार अपात्रता सुनावणी 18 दिवस चालणार ;

वेध माझा ऑनलाइन। सगळ्या देशाच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून असलेल्या शिवसेना आमदार अपात्रता सुनावणी  प्रकरनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर  यांनी महत्त्वाची माहिती दिली.आमदार अपात्रता सुनावणी ही 18 दिवस चालणार असल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटले. विधानसभा अध्यक्षांनी सुनावणीच्या तारखा दोन्ही गटासमोर वाचून दाखवल्या. या प्रकरणाची सुनावणी नागपूर येथेही होणार असल्याचे नार्वेकर यांनी म्हटले. 

शिवसेना ठाकरे गटाचे प्रतोद सुनिल प्रभू यांची शिंदे गटाचे वकिल अॅड. महेश जेठमलानी यांच्याकडून उलट तपासणी सुरू आहे. बुधवारी आमदार अपात्रता सुनावणी दरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुनावणीच्या गतीवरून नाराजी व्यक्त केली होती. फक्त 16 दिवस माझ्याकडे या सुनावणी साठी आहे त्यात हे प्रकरणाची सुनावणी संपवून निर्णय घ्यायचा आहे, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटले. नार्वेकर यांनी म्हटले की, मला 31 डिसेंबरपर्यंत या प्रकरणांची सुनावणी संपवायची आहे. सार्वजनिक सुट्ट्या आणि अधिवेशन कालावधी वगळता माझ्याकडे या प्रकरणाची सुनावणी पूर्ण करण्याकरिता फक्त 16 दिवसाचा कालावधी आहे असल्याचे त्यांनी दोन्ही पक्षकारांना सांगितले होते. त्यानंतर आज विधानसभा अध्यक्षांनी आज सुनावणीचे वेळापत्रक जाहीर केले. 

आमदार अपात्रता सुनावणीचे असे आहे वेळापत्रक
शिवसेना आमदार आपत्रता प्रकरण सुनावणी 18 दिवसांमध्ये चालणार आहे. विधानसभा अध्यक्षांनी सुनावणीच्या तारखा दोन्ही गटासमोर वाचून दाखवल्या. 

>> पुढील सुनावणी तारखा -
> 28, 29 आणि 30 नोव्हेंबर 
> 1, 2, 5, 6 आणि 7 डिसेंबर 
> 11 ते 15 डिसेंबर सलग सुनावणी
> 18 ते 22  डिसेंबर सलग सुनावणी

हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबरपासून सुरू झाल्यास 11 डिसेंबरपासून सुनावणी नागपूरला होणार असल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटले.  एकूण 18 दिवसात सुनावणी पूर्ण करायची आहे हातात असलेले दिवस आणि तारखा दोन्ही गटासमोर नार्वेकर यांनी सांगितल्या. यापुढे सार्वजनिक सुट्या मिळून या तारखा आता सुनावणीसाठी असणार आहेत.


जरांगे पाटील राजकीय बोलू लागले ; म्हणाले...भुजबळ भाजपमध्ये पलटी मारणार ;

वेधमाझा ऑनलाईन। राज्यात मराठा आरक्षणासाठी काही महिन्यांपासून आंदोलन, मोर्चे सुरू आहेत. या मराठा आरक्षणाच्या वादावर ओबीसी नेते भुजबळ आणि मनोज जरांगे-पाटील यांच्यात दिवसेंदिवस वाद कमी होण्याऐवजी वाढू लागला आहे. दोन्ही नेते आपापल्या सभेत एकमेकांवर टीका करत आहेत. मात्र जरांगेंनी छगन भुजबळ हे भाजपमध्ये पलटी मारणार असल्याचं वक्तव्य केलं होतं. या राजकीय वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता वर्तवली जात  आहे. जरांगे हे आत्तापर्यंत मराठा आरक्षणावर बोलत असायचे मात्र आता त्यांनी राजकीय वक्तव्य करत भुजबळ भाजपमध्ये जाणार असल्याचे सांगितले आहे. अहमदनगरच्या दौऱ्यावर असताना पत्रकारांशी बोलत होते.

काय म्हणाले जरांगे-पाटील
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करण्यासाठी भुजबळांचा आधीपासून विरोध आहे. हा विरोध लक्षात घेऊन मराठा आंदोलकांनी भुजबळ भाजपमध्ये पलट्या मारणार असल्याचे वक्तव्य केलं आहे. यावेळी जरांगे म्हणाले की, गृहमंत्री त्यांना काही म्हणत नाहीत. मराठा समाजाला त्रास देण्यासाठी त्यांना भाजपमध्ये पलट्या मारायच्या आहेत. देवेंद्र फडणवीस काहीच म्हणत नाहीत. यावर आम्ही शंका का घेऊ नये. भुजबळांना पलटी मारायची सवय आहे. त्यांनी आत्तापर्यंत दहा-पंधरा वेळा पलट्या मारल्या आहेत. मराठ्यांच्या लेकरांचं वाटोळं करण्यासाठी सरकारने भुजबळांना फुस लावली आहे. असे जरांगे म्हणाले आहेत.

कोरोना महामारीनंतर आता चीनमध्ये एका नवीन आजाराचे थैमान ; लहान मुलांमध्ये या आजाराचा वाढतोय प्रादुर्भाव ;

वेध माझा ऑनलाइन। कोरोना महामारीनंतर आता चीनमध्ये एका नवीन आजाराने मोठ्या प्रमाणावर थैमान घातले आहे. चीनमधील अनेक शाळांमध्ये आणखी एक आजार वेगाने पसरत आहे. येथील शाळांमधील मुलांमध्ये न्यूमोनिया आजाराचा प्रादुर्भाव वाढत आहे. दरम्यान, ही चिंताजनक परिस्थिती कोरोना संकटाच्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण करून देणारी आहे. 

चीनमधील बीजिंग आणि लिओनिंग येथील रुग्णालयात मोठ्या संख्येने मुलांना दाखल केले जात आहे. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, या रहस्यमय न्यूमोनियाच्या आजारामुळे अनेक शाळा बंद आहेत. दरम्यान, न्यूमोनियाने बाधित झालेल्या मुलांमध्ये फुफ्फुसात सूज येणे आणि ताप येणे, यासह असामान्य लक्षणे दिसून येत आहेत. मात्र, खोकला, आरएसव्ही आणि श्वसन रोगांशी संबंधित इतर लक्षणे त्या मुलांमध्ये दिसत नाहीत. 

ओपन-एक्सेस सर्व्हिलांस प्लॅटफॉर्म प्रोमेडने मंगळवारी विशेषत: लहान मुलांवर परिणाम होणाऱ्या निदान न झालेल्या न्यूमोनियाच्या उदयोन्मुख साथीच्या आजाराबद्दल चेतावणी दिली आहे. "हा उद्रेक नेमका केव्हा सुरू झाला हे स्पष्ट नाही, कारण इतक्या मुलांवर इतक्या लवकर परिणाम होणे असामान्य नाही", असे प्रोमेडने म्हटले आहे. याशिवाय, अहवालात असेही म्हटले आहे की, हा आजार एक महामारी आहे की नाही, यासंदर्भात अंदाज वर्तविणे घाईचे ठरेल. पण तरीही आपण सावधगिरी बाळगली पाहिजे.

दरम्यान, या नवीन उद्रेकामुळे रुग्णालयात मोठ्या प्रमाणात आजारी मुले आहेत, असे तैवानच्या आउटलेट एफटीव्ही न्यूजने वृत्त दिले आहे. तसेच, अधिकारी महामारी लपवत आहेत का? असा सवाल शाळेतील मुलांच्या पालकांनी उपस्थित केला आहे. परंतु नवीन उद्रेक मायकोप्लाझ्मा न्यूमोनियाशी संबंधित असू शकतो, ज्याला वॉकिंग न्यूमोनिया असेही म्हटले जाते, अशी शंका आहे, जी चीनमध्ये वाढत आहे.

श्रीनिवास पाटील यांची खासदारकी रद्द करा ; अजित पवार गटाची मागणी ;

वेध माझा ऑनलाइन। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या शरद पवार गटातील सातारचे खासदार श्रीनिवास पाटील यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करावे,अशी मागणी अजित पवार गटाने नुकतीच केली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार गटाकडून लोकसभेचे अध्यक्ष आणि राज्यसभेचे सभापती दोघांकडे एक याचिका दाखल केली असून यामध्ये शरद पवार यांच्या गटातील सदस्यांना अपात्र करा, अशी मुख्य मागणी या याचिकेत केली आहे.तसेच याच गटाचे खासदार वंदना चव्हाण आणि फौजिया खान यांचंही सदस्यत्व रद्द करण्याची मागणी अजित पवार गटाने केली आहे. काल शरद पवार गटाच्या खासदारांनी प्रफुल पटेल यांच्यावर देखील कारवाईची मागणी केली होती. 

Wednesday, November 22, 2023

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठलाची पूजा ;

वेध माझा ऑनलाईन। आज कार्तिकी एकादशी असून, यानिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकिय महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाली आहे. तर, यंदाचे मानाचे वारकरी म्हणून नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील माळेदुमाला गावातील बबन विठोबा घुगे आणि वत्सला बबन घुगे यांना पुजेचा मान मिळाला आहे. गेल्या 15 वर्षांपासून ते न चुकता वारी करतायत.

दरवर्षीप्रमाणे यंदाही कार्तिकी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. तसेच, अनेक वर्षांच्या प्रथेप्रमाणे कार्तिकी एकादशी निमित्त आज पहाटे राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नीच्या हस्ते महापूजा करण्यात आली. त्यामुळे, या पूजेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांची पत्नी अमृता फडणवीस एकदिवसीय आधीच म्हणजे बुधवारीच पंढरपूरात दाखल झाले होते. दरम्यान, देवेंद्र फडणवीस आणि अमृता यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापुजा संपन्न झाली. यावेळी श्री. विठ्ठलाच्या मूर्तीला अभिषेक घालण्यात आला, आणि त्यानंतर मंत्रोपचारामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सपत्निक पूजा करण्यात आली. तर, यावेळी नाशिक जिल्ह्यातील बबन विठोबा घुगे आणि वत्सला बबन घुगे यांना उपमुख्यमंत्र्यांबरोबर विठ्ठलाची पुजा करण्याचा मान मिळाला आहे. या पूजेनंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीतर्फे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अमृता फडणवीस आणि मानाचे वारकरी घुगे दाम्पत यांचा सत्कार करण्यात आला.

कार्तिकि यात्रेला भाविकांची संख्या निम्म्याने घटली ; काय आहे कारण? ;

वेध माझा ऑनलाइन।  राज्यात सध्या सुरु असलेल्या ताणतणावामुळे कार्तिकी यात्रेकडे वारकरी संप्रदायाने पाठ फिरवली असून यंदाची यात्रा विक्रमी होणार अशा अंदाजाने प्रशासनाने जय्यत तयारी केली होती. मात्र यात्रेकरूंच्या घटलेल्या संख्येमुळे राज्यातील तणावाचा फटका कार्तिकी यात्रेला बसल्याचे समोर येत आहे. 


बुधवारी दुपारीपर्यंत यात्रेसाठी येणाऱ्या जवळपास साडेतीन लाख भाविकांसाठी मोफत निवास व्यवस्था असणाऱ्या भक्तिसागर येथे केवळ दोन लाख भाविक पोचले आहेत. मंदिर परिसर, गोपाळपूर दर्शन रांग, चंद्रभागा वाळवंट, भक्तिसागर परिसर याच ठिकाणी गर्दी दिसत असून शहरातील इतर भागात कार्तिकी यात्रेचे कोणतेही अस्तित्व दिसत नाही. विठ्ठल दर्शनासाठी गोदापालपूर येथे एकूण 14 पत्राशेडची उभारणी केली असली तरी केवळ 9 ते 10 पत्राशेडच्या बाहेर अद्याप दर्शनाची रांग गेलेली नसून दर्शनाला सध्या 12 ते 13 तास एवढाच कालावधी लागत आहे.

दरम्यान प्रत्येक वारकऱ्यांसाठी दशमीचे चंद्रभागेचे स्नान हे पवित्र मानले जाते, मात्र यंदा उजनीतून सोडलेले पाणी अजूनही चंद्रभागेत न पोचल्याने भाविकांना पात्रात असणाऱ्या थोड्या आणि दुर्गंधीयुक्त पाण्यात स्नान करायची वेळ आली. जलसंपदा विभागाने पाणी सोडताना योग्य नियोजन केले असते तर यात्रेसाठी आलेल्या हजारो भाविकांना स्वच्छ आणि मुबलक पाण्यात स्नानाचा आनंद घेता आला असता .  

गुरुवारी रात्री बारा वाजता विठ्ठल मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी बंद करण्यात येणार असून साफसफाई झाल्यावर मंदिराची पाद्यपूजा यानंतर नित्यपूजा होईल. पहाटे अडीच वाजता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंदिरात येऊन सुरुवातीला विठूरायाची आणि नंतर रुक्मिणी मातेची महापूजा करतील. यानंतर पहाटे साडेतीन वाजता विठ्ठल मंदिराच्या 73 कोटीच्या कामाचे भूमिपूजन मंदिरातील बाजीराव पडसाळी येथे होईल. यानंतर मंदिर समितीच्या वतीने उपमुख्यमंत्री आणि मानाचा वारकरी यांचा सत्कार होईल. यावर्षीही सर्व पूजा आणि इतर कार्यक्रमाच्या वेळीही मुखदर्शन सुरूच राहणार असल्याने रात्री बारानंतरही मुखदर्शन रांगेत कोणताही खंड पडणार नाही . 

दरम्यान देवेंद्र फडणवीस हे मराठा, धनगर, आदिवासी कोळी या समाजाच्या शिष्ठमंडळासह विविध शिष्ठमंडळाना यावेळी भेटीसाठी वेळ देणार आहेत. उपमुख्यमंत्र्यांच्या पूजेचा विरोध संपला असला तरी पोलीस प्रशासनाने मात्र सर्व प्रकारच्या खबरदारी घेतल्या आहेत . एकंदर उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यातील सर्वच ठिकाणी सुरक्षा पासेस शिवाय कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही