वेध माझा ऑनलाइन। मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी अपयशी ठरलेली मंडळी आता मराठा समाजाला भडकावण्याचे काम करत आहे. उद्धव ठाकरे हे मराठा समाजाच्या आरक्षणाचे मारेकरी आहेत. मराठा समाजाबद्दल बोलण्याचा त्यांना काही अधिकार नाही,’ अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाचा आरक्षणासंदर्भात बैठक घेतली. या बैठकीत मराठा आरक्षण आणि राज्यातील परिस्थितीवर चर्चा झाली. त्यावेळी दोन्ही उपमुख्यमंत्री बैठकीला नव्हते. अशी टीका उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी केली. त्यावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही टीका केली. त्यामुळे मराठा आरक्षण मुद्द्यावर या दोघांमध्ये येत्या काळात तू तू मै मै होणार आहे.
‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाचा आरक्षणासंदर्भात बैठक घेतली. या बैठकीत मराठा आरक्षण आणि राज्यातील परिस्थितीवर चर्चा झाली. त्यावेळी दोन्ही उपमुख्यमंत्री बैठकीला नव्हते. एका उपमुख्यमंत्र्यांना डेंग्यू झाल्याचे सांगितले जात आहे. तर दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातील प्रश्न सोडून दुसऱ्या राज्यात भाजपच्या प्रचारास गेले होते. रायपूरमध्ये ते निवडणुकीचा प्रचार करत आहे. त्यामुळे त्यांना राज्य आणि राज्यातील प्रश्न किती महत्वाचे आहे? हे दिसून येत असल्याचा घणाघात शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. आरक्षणासाठी दिल्लीत दबाब गट तयार करण्याची गरज आहे. त्यासाठी वेळ पडल्यास महाराष्ट्रातील सर्व ४८ खासदारांनी राजीनामा द्यावा,’ असे उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत म्हटले होते. त्यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी ही टीका केली.
No comments:
Post a Comment