Sunday, June 23, 2024

वेध माझा ऑनलाइन।

गेल्या 10 दिवसांपासून जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे ओबीसी आंदोलक लक्ष्म हाकेंचं उपोषण सुरू आहे. राज्य सरकारने ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गातून आरक्षण द्यावं. तसेच सगेसोयरे अधिसूचना लागू करू नये, अशी लक्ष्मण हाकेंची मागणी आहे.

लक्ष्म हाके यांच्या या उपोषणाची धग आता खेड्यापाड्यात पसरली आहे. अनेक ओबीसी बांधवांनी त्यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. बीडच्या आष्टी तालुक्यातील खिळद येथील ओबीसी बांधवांनी हाके यांच्या समर्थनार्थ आमरण उपोषण सुरू केलं आहे. गेल्या 3 दिवसांपासून हे उपोषण सुरू आहे.
ओबीसी समाज देखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं. राज्यात ओबीसी विरूद्ध मराठा समाज असा वाद होताना दिसत आहे. अशात बीडच्या आष्टी तालुक्यातील खिळद येथील ओबीसी आंदोलकांनी मोठी मागणी केलीये.
मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही. पण त्यांना स्वतंत्र आरक्षण द्यावं, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. यावेळी त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी देखील केली आहे. दुसरीकडे हाके यांना पाठिंबा देण्यासाठी नांदेड येथून मोठ्या प्रमाणावर ओबीसी बांधव वडीगोद्रीकडे रवाना झाले आहेत.
मराठ्यांच्या जमिनी आमच्या नावावर करा”
राज्य सरकारला जर मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यायचं असेल, तर त्यांच्या जमिनी आणि कारखाने आमच्या नावावर करावेत, असं आव्हान पाटण येथील आंदोलकांनी सरकारला दिलं आहे.



No comments:

Post a Comment