कराड दक्षिण चे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना मोठा धक्का बसला आहे त्यांचे मलकापूर मधील निकटवर्तीय नगरसेवक व काँग्रेसचे नेते राजेंद्र यादव उर्फ आर आबा हे उद्या भाजप मध्ये प्रवेश करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे उद्या मुंबईत उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार आहे त्यांच्या सोबत मलकापुरातील 3 ते 4 नगरसेवक देखील प्रवेश करणार असल्याचे समजते...ते नुकतेच मुंबईला रवाना झाले आहेत अशीही माहिती मिळत आहे...
मलकापूर येथील राजकारणात मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे... एकीकडे डॉ अतुल भोसले यांचे नेतृत्व आहे... तर दुसरीकडे मनोहर शिंदे यांची लिडरशिप आहे... सत्तेत मनोहर शिंदे हे जरी त्याठिकाणी होते तरी आर आबा याना बरोबर घेतल्याशिवाय त्यांच्या नेतृत्वाला पूर्णत्व त्याठिकाणी येत नव्हते... अशी चर्चा नेहमी असायची... आर आबांचा वापर करत मनोहर शिंदेंनी जमेल तेवढ राजकारण केलं खरं...मात्र मनोहर शिंदेंच्या एकूणच राजकारण करण्याची पद्धत तेथे अनेकाना मान्य नव्हती...आजही मान्य नाही...असे काहीजण आजही खासगीत बोलतात... मनोहर शिंदे यांच्या एकाधिकारशाहीच्या राजकारणाला अनेकजण कंटाळले असल्याची तर नेहमीच चर्चा असते... त्यांच्यावर विरोधकांकडून याबाबत वारंवार आरोपही झाले आहेत...त्याची अनेक उदाहरणे आहेत...त्यापैकी एक उदाहरण जे नेहमी चर्चेत असते ते म्हणजे... नगराध्यक्षा सौ एडगे याना लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्यावर शासनाकडून मिळणारी चार चाकी गाडी मनोहर भाऊंनी पार्टी प्रमुख म्हणून पुढाकार घेऊन ताब्यात घेणे गरजेचे होते... पालिकेत याबाबत ठराव देखील झाला होता...त्यादरम्यान संपूर्ण राज्यभरातील लोकनियुक्त नगराध्यक्षाना या गाड्या मिळाल्या... तरी मलकापूरच्या नगराध्यक्षाना शेवटपर्यंत म्हणजे... त्यांचा कार्यकाळ संपेपर्यंत ही गाडी मिळालीच नाही...मग, त्यामागचे राजकारण काय ? हे गुलदस्त्यातच राहिले...पण, कार्यकर्ता मोठा झाला नाही पाहिजे...तो समाजात मोठा दिसला देखील नाही पाहिजे...ही प्रवृत्ती यामागे असल्याचे संपूर्ण मलकापूरला जाणवले...दरम्यान याविषयाबाबत पत्रकार वारंवार प्रश्न विचारत होते...मात्र त्यांना थातूर मातूर उत्तर देत मनोहरभाऊ वेळ मारून नेत होते... या कारणासह मलकापुरातील प्रत्येक कामात भाऊंचा नको तितका हस्तक्षेप असायचा... अशीही चर्चा असते...काँग्रेस पक्षाच्या नावावर त्यांची जरी ओळख असली तरी ... काँग्रेसपक्ष त्यांनी किती वाढवला... हा संपूर्ण तालुक्याला आजही न सुटलेला प्रश्न आहे ...या , अणि अशा अनेक कारणामुळे काँग्रेस पार्टीतील अनेकजण त्यांच्या कार्यपद्धतीवर देखील नाराज दिसतात ही वस्तुस्थिती आहे... त्यामुळे...नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत मनोहर शिंदेंचे नेतृत्व मलकापुरात अजिबात चालले नाही असेच दिसून आले... तर डॉ अतुल भोसले त्यांना मलकापुरात खूपच भारी ठरले हेही दिसले... अशा अनेक कारणांमुळे मनोहर शिंदेंचे सहकारी त्यांच्याजवळ कितपत राहतात,... की त्यांना हळूहळू सोडून जातात... हेच आता यापुढे पहावे लागेल...
दरम्यान यापुढे भाजप प्रवेशानंतर आर आबा यांची ताकद अतुल भोसले याना मिळाल्यास मलकापुरात नक्कीच डॉ अतुल बाबांची सत्ता दिसेल असे चित्र आता स्पष्ट दिसत आहे... होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर देखील आर आबा यांचा भाजप प्रवेश कराड दक्षिणच्या राजकारणाला भाजपमय करण्यासाठी चांगलाच हातभार लावणारा ठरणार... हेही निश्चित आहे...
दरम्यान उद्या त्यांचा मुंबईत रीतसर भाजप प्रवेश होणार असल्याचे वृत्त आहे त्यासाठी आर आबा मुंबईकडे रवाना झाल्याचीही माहिती मिळत आहे
No comments:
Post a Comment