वेध माझा ऑनलाइन।
पुण्यात पुन्हा एकदा पोर्शे कार अपघातासारखा थरार पाहायला मिळाला आहे. पोर्शे कार अपघातानंतर पुन्हा एकदा पुणे शहरात भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्याने पुण्याच्या रस्त्यावर कार चालवताना दोघांना उडवलं असल्याची माहिती समोर आली आहे. हा अपघात पुणे-नाशिक महामार्गावरील कळंब येथे झाला.
अपघातात एकाचा जागीच मृत्यू
दुचाकी आणि कारचा भीषण अपघात झाला असल्याची माहिती समोर आली. तसेच यामध्ये धक्कादायक बाब म्हणजे दोघांना चिरडलं असून यातील एकाचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. अपघातात ओम सुनिल भालेरावचा जागीच मृत्यू झाला. रविवारी मध्यरात्री पुणे नाशिक महामार्गावर हा भीषण अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहिते पाटील हे खेड तालुक्याचे आमदार आहेत. त्यांचा पुतण्या मयुर मोहितेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी त्याने मद्यप्राशन केलं होतं का? हे देखील तपासण्यात येणार आहे.
या अपघातात ओम भालेरावचा मृत्यू झाला. ओम भालेराव हा 19 वर्षाचा होता. मयुर मोहिते हा पुण्याकडे जात असताना हा धक्कादायक प्रकार घडला. तो विरूद्ध दिशेने गाडी चालवत होता. त्यावेळी समोरुन आलेल्या दुचाकीला भरधाव गाडीने उडवलं. या अपघातात दुसरा तरूण हा गंभीर जखमी झाला. त्यांच्यावर स्थानिक रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, पुणे पोर्शे प्रकरणानंतर हा दुसरा अपघात झाला आहे. यामध्ये आणखी एका आमदारांचं कनेक्शन असल्याचं बोललं जात आहे. मात्र अशातच आता दुसऱ्या अपघाताने पोलीस प्रशासनावर अनेक प्रश्न उपस्थित होताना दिसत आहेत.
पुणे पोर्शे अपघातात आमदार सुनिल टिंगरेंचं नाव चर्चेत आलं. त्यानंतर आता नुकत्याच झालेल्या अपघातात आमदार दिलीप मोहिते पाटील यांचं नाव आलं. दोन्ही आमदार हे अजित पवार गटाचे आमदार आहेत.
No comments:
Post a Comment