वेध माझा ऑनलाइन ; सांगली लोकसभेच्या जागेवरून काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम आणि नवनिवार्चित खासदार विशाल पाटील यांनी नाव न घेता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधला. सांगली लोकसभेमध्ये बाहेरून खडे टाकणाऱ्यांना लोकसभेत त्यांना त्यांची जागा दाखवली, अजून बरंच काही बोलायचं बाकी आहे. ते देखील लवकरच बोलणार आहे. तसेच असं म्हणत विश्वजित कदम यांनी जयंत पाटलांना एकप्रकारे इशारा दिला होता. यानंतर आता जयंत पाटील यांच्या एका कट्टर समर्थकाने रिल्सच्या माध्यमातुन विश्वजित कदम आणि विशाल पाटील या दोघांवर ही व्हीडिओ रील व्हायरल करून पलटवार केला आहे.
काय आहे व्हीडिओ रील मध्ये
जयंत पाटील गोड बोलतात, पण जयंत पाटलांचा विरोध तुम्ही बघितलेला नाही, मला त्या टोकाला जायला लावू नका, आहे ते सगळं गमवाल, एवढंच सांगतो, असं वक्तव्य जयंत पाटील यांनी एका भाषणात केलं होतं. याच भाषणाचा आधार घेत जयंत पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी एक रील बनवून ते सोशल मीडियावर व्हायरल केलं आहे. एकप्रकारे विशाल पाटील आणि विश्वजित कदम याना हा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे येत्या काळात सांगलीच्या राजकारणात अनेक वेगवेगळ्या घडामोडी पाहायला मिळू शकतात.
No comments:
Post a Comment