Thursday, June 13, 2024

पुण्यात पुन्हा हिट अँड रन ची घटना ; भरधाव कारने महिलेला उडवलं - 24 तासांनंतर देखील गुन्हा नोंद नाही ;

वेध माझा ऑनलाइन
काही दिवसांपुर्वी पुण्यात बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने दोघांना कारने उडवलं होतं. यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी अजूनही तपास सुरूच आहे. अशात पुण्यात पुन्हा हिट अँड रनची घटना घडली आहे. विशेष म्हणजे, 24 उलटूनही पोलिसांकडून अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाहीये.

भोसरी परिसरात हिट अँड रनचा प्रकार घडला आहे. याबाबत अजूनही गुन्हा दाखल न करण्यात आल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. भोसरी एमआयडीसी परिसरातील स्वराज सोसायटी समोर भरधाव कारने महिलेला उडवलं आहे.
त्यानंतर ती कार न थांबता निघून गेली. या अपघाताची घटना ही सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. अपघातात त्या महिलेला जखमी करून संबंधित कारचालक कारसह पसार झाला आहे. या घटनेला 24 तास उलटून गेले आहेत.
भोसरी एमआयडीसी पोलिसांनी अद्यापही या अपघाताबाबत गुन्हा दाखल केला नाहीये. अशीच एक घटना हिंजवडी भागात देखील घडली होती. दोन दिवसांपुर्वी झालेल्या या अपघाताबद्दल नंतर बातमी समोर आल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.पोलिसांकडून अद्यापही गुन्हा दाखल झाला नाहीमात्र, या घटनेबाबत अजूनही गुन्हा दाखल न झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे. 


No comments:

Post a Comment