पती-पत्नीच्या नात्याला काळीमा लावणारी घटना पुणे शहरातील भारती विद्यापीठ येथे घडली आहे. पती पत्नी हे संसाराच्या गाड्याची चाकं असतात. मात्र आता पतीने उचललेलं पाऊल हे पती-पत्नीच्या नात्याला काळीमा लावणारं ठरलं आहे. पतीने आपल्या पत्नीला भारती विद्यापीठ येथील एक लॉजवर नेत चाकूने वार करत तिची हत्या केली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
पतीने पत्नीचा केला खून, पतीवर गुन्हा दाखल
या घडलेल्या प्रकरणात पोलिसांनी पतीला ताब्यात घेतलं असल्याची माहिती समोर आली आहे. एका 27 वर्षीय पत्नीचा नराधम पतीने जीव घेतला आहे. या नराधम पतीला भारती विद्यापीठातील पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोघांमध्ये घटस्फोटाचं प्रकरण सुरू होतं. मात्र, दोघांनी पुन्हा एकत्र राहण्याचं ठरवलं. यानंतर पतीने पत्नीला लॉजवर भेटून चर्चा करण्यासाठी बोलवलं होतं. शनिवारी दुपारी दोघंही भारती विद्यापीठ परिसरातील अश्विनी लॉजवर गेले. तिथे त्यांनी मद्यपान केलं. नशेत त्यांचा पुन्हा वाद झाला आणि या वादातून पतीने चाकूने भोसकून पत्नीची हत्या केली. यानंतर पती बाहेरून लॉक लावून फरार झाला.
पती आपल्या मित्रांसोबत मद्यपान करत असताना त्याने ही गोष्ट मित्रांना सांगितली. याबद्दल ऐकताच मित्र घाबरले आणि त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी लॉजवरील मृतदेह ताब्यात घेतशवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठवला आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.
No comments:
Post a Comment