“मी राज ठाकरेंना विचारु इच्छितो की राज ठाकरे लहान होते तेव्हा शाळेतून आले नाहीत की बाळासाहेब विचारायचे राजा अजून कसा आला नाही? माँ विचारायच्या राजा का आला नाही? राज ठाकरे घरी आल्याशिवाय माँ आणि बाळासाहेब हे दोघंही जेवत नव्हते. रक्ताचं नातं आहे. मतभेद झाले तरीही तुम्ही हे लक्षात घ्यायचं होतं की शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची आहे. मतभेद होते तरीही सांभाळून घ्यायला नको का ? बाळासाहेबांना किती दुःख झालं असेल की ज्याला मी लहानपणापासून सांभाळत होतो त्याने असं करावं हे त्यांना वाटलंच असेल.” असं भुजबळ म्हणाले.एका मराठी वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत भुजबळ यांनी हे भाष्य केलं आहे.
राज ठाकरेंनी चूक केली
यापुढे भुजबळ म्हणाले, “राज ठाकरेंनी मनसे पक्ष काढला तो पुढचा भाग. शिवसेना सोडून त्यांनी चूक केली. एकमेकांवर टीका झाली. शिवसेना आणि राज ठाकरेंवर किती टीका टिपण्णी झाली. बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना सांगितलं असतं की हे नाही तर ते काम कर. त्यांनी (राज ठाकरे) ऐकायचं होतं. “
राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली तेव्हा मी दोघांनाही फोन केला आणि बोललो की पाच ते सहा दिवस एकमेकांविरोधात काहीही बोलू नका. राग हा त्या क्षणापुरता असतो, राग शांत झाला की मन बदलतं. दोघांनीही ऐकलं पण मतभेद झाले आणि राज ठाकरेंनी त्यांचा निर्णय घेतल्याचं भुजबळ यांनी सागितलं.
No comments:
Post a Comment