राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांच्यासोबत अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. त्यांच्यासोबत घडलेला प्रसंग त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सांगितला आहे.
दोन बेवड्यांनी रुपाली पाटील आणि त्यांच्यासोबत असलेल्या महिलेचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. अखेर त्यांनी आरडोओरडा केल्यावर आणि ठणकावून जाब विचारल्यावर दोन बेवड्यांनी पळ काढला.
रुपाली पाटील ठोंबरे यांची पोस्ट ?
अत्यंत भयाण प्रसंग होता कालचा. सायंकाळी 7 ते 7.30 वेळ भोर येथील पिसावरे या गावात आमचे बंधू आण्णा बांदल यांच्या घराची वास्तुशांतीसाठी निघाले. मनीषाताई कावेडिया ,पूनम गुंजाळ सोबत होत्या. भोर मधून नांद या गावाकडचा मधला रस्ता हा अत्यंत शांत आणि छोटे रस्ते आम्ही ज्या दिशेला जात होतो त्या विरुद्ध दिशेने टू व्हीलरवर दोन एसम गाडीला किक मारत होते.ते फुल प्यालेले होते. आम्ही आपलं पुढे निघालो महिला पाहून ते गाडीचा पाठलाग करत आमच्या मागे मागे जवळ जवळ दीड ते दोन किलोमीटर आले. ते मागे येतात हे समजताच, गाडी थांबवू नको, रस्त्यावर कोणी नाही असे मनिषाला सांगितले. व्हीलरची लाईट बंद करून हे दोन बेवडे गाडीच्या मागे येऊन टू व्हीलर आडवी घातली. महिला आहे हे दिसत असताना सुद्धा एका माणूस डायरेक्ट अंगावर आला
तेव्हा तातडीने मी गाडीतून उतरून त्याला जाब विचारायला सुरुवात केली. दोघे पूर्ण नशेतच होते मग डायरेक्ट आरडाओरडा सुर केला आणि काढ ती बंदूक असे म्हणाले तेव्हा कुठे बेवडा स्थिर झाला. त्यानंतर त्याला माझी ओळख कळली. मग रूपालीताई पाटील ठोंबरे आहेत म्हंटल्यावर त्याने तिथून पळ काढला. हे घडल्यावर क्षणभर मनात विचार आला माझ्या जागेवर जर इतर कोणी महिला असत्या तर या दोन बेवड्यांनी काय केलं असतं याचा विचार न केलेला बरं. एखादा मोठा गुन्हा नक्कीच घडला असता हे असे दारू पिऊन जी विकृत लोक फिरतात नशेत गुन्हे करतात यांचा बंदोबस्त करणं गरजेचं आहे यांच्यावर कठोर कारवाई करणे गुन्हे दाखल करणे गरजेचे आहे. दारू पिऊन रस्त्यावर अशा पद्धतीने महिलांना, लोकांना त्रास होईल असे वागणे आणि यातूनच गुन्हे घडणे हे प्रकार मोठ्या प्रमाणात घडतात त्यामुळे यांच्यावर आळा बसणे अत्यंत गरजेचे आहे यांना कायद्याची भीती बसणे सुद्धा गरजेची आहे
मी त्यानंतर गाडीतून कंट्रोलला फोन करून घडलेली घटना सांगितली त्याचा गाडीचा नंबर त्यांचा फोटो तोही पाठवला अशा घटना कुठल्याही सर्वसामान्य महिलेसोबत, लोकांसोबत घडू शकतो याच्यातून मोठा गुन्हा होऊ शकतो त्यासाठी कारवाई होणे गरजेचे आहे. बेवडे जाताना फोटो, गाडी नंबर फोटो काढला असल्या बेवड्या लोकांना सोडायचं नाही चंगच बांधला.
दारू पिऊन फिरणाऱ्या लोकांवर कारवाई झालीच पाहिजे त्यातूनच गुन्हे घडण्यास हिंमत मिळते. माझ्या माता, भगिनी, मैत्रिणींनो सक्षम व्हा, प्रसंगातून युक्त्या वापरून आपले रक्षण करा आपली सुरक्षा,रक्षण आपल्यालाच करावे लागते. वेळ प्रसंगी काली, दुर्गा अवतार घ्यावाच लागतो म्हणून काल आम्ही महिला बचावलो.
No comments:
Post a Comment