Thursday, June 13, 2024

कराड इनरव्हील क्लबच्या अध्यक्षपदी सौ नम्रता कंटक तर सचिवपदी सौ वैशाली पालकर ; दोन्ही पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र होतय अभिनंदन ;

वेध माझा ऑनलाइन
सन 2024-25 यावर्षी इनरव्हील क्लब ऑफ कराडच्या अध्यक्षपदी सौ नम्रता कंटक तर सचिव पदी सौ वैशाली पालकर यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. या दोन्ही पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे
तसेच नवीन संचालकांमध्ये आय. पी. पी. सीमा पुरोहित, उपाध्यक्षपदी अनघा बर्डे, खजिनदारपदी रूपाली डांगे, आयएसओपदी अनुराधा टकले, संपादक पदी अदिती पावसकर ,सी .सी. स्नेहल देशपांडे तसेच सी.एल. सी. सी. पदी संगीता पालकर आणि चार्टर प्रेसिडेंट रेखा काशीद, स्मिता शिराळकर, सुजाता बेंद्रे ,आणि अश्विनी शेवाळे ,डॉ. मनीषा जाधव, आशा भिसे यांची एक्झिक्युटिव्ह कमिटी मध्ये निवड करण्यात आली आहे. 

इनरव्हील क्लब ऑफ कराड नेहमीच वेगवेगळे  सामाजिक उपक्रम  राबवित असते.त्यामध्ये ऊसतोड कामगार स्त्रियांसाठी मदत, वीटभट्टी वर काम करणार्या महिलांना तसेच कराडमधील सामाजिक संस्था अवनी संस्था ,आशा किरण संस्था अशा सामाजिक संस्थां मध्ये  आर्थिक,शैक्षणिक मदत करत असतेच. शाळांमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप, गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप असे सामाजिक उपक्रम सतत राबवित असते. 

२०२४ -२५ या वर्षाकरिता डिस्ट्रिक्ट चेअरमन डॉक्टर शोभना पालेकर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच इनरव्हील क्लब ऑफ कराडच्या सर्व सदस्यांच्या मदतीने कराड परिसरातील निराधार महिला, अनाथ मुले यांचे आरोग्य विषयी उपक्रम राबवणे, शैक्षणिक संदर्भात विविध सामाजिक उपक्रम राबवणे, सध्या वाढत चाललेल्या ह्रदयरोगाविषयी जनजागृती करणे तसेच व्यवसाय उपलब्धतता आणि शैक्षणिक पातळीवरील काही उपयुक्त उपक्रम राबविण्याचा मानस अध्यक्ष नम्रता कंटक आणि सचिव वैशाली पालकर यांनी व्यक्त केला आहे.

No comments:

Post a Comment