Saturday, June 22, 2024

भूजबळांनी घेतला जरांगे पाटील यांचा समाचार ; म्हणाले... औकातीत रहा बेट्या...

वेध माझा ऑनलाइन
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यात सध्या शाब्दिक वार सुरू आहे. आज (22 जून) छगन भुजबळ हे वडीगोद्री येथे लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनस्थळी गेले होते. यावेळी त्यांनी जरांगे यांचा समाचार घेतला.

“औकीतत राहा बेट्या हो..आम्ही शांत बसलो म्हणजे गरीब आहोत. आम्ही जनावरं नाही, कुठेही न्यावं. ते माकडं म्हणतंय भुजबळांना जमानतीवर सोडलं. अरे काय बोलतो त्याला कळत नाही. काय बोलावं कुठं बोलावं कळत नाही. मी त्याला बोलण्याऐवजी हाकेंसोबत त्याने चर्चा करावी मग आमच्याकडे यावं.”, असं भुजबळ म्हणाले आहेत.

भुजबळ यांचा जरांगेंना इशारा
यावेळी मंत्री भुजबळ यांनी जरांगे पाटील यांचा ‘माकड’ असा उल्लेख केला आहे. तसंच तो (मनोज जरांगे) बसलाय तिकडे, जातीयवाद करतोय. मनोज जरांगेंना आरक्षण म्हणजे काय ते माहित नाही. आरक्षण हा गरिबी हटावचा कार्यक्रम नाही, असा टोला देखील यावेळी भुजबळ यांनी लगावला.
पुढे बोलताना भुजबळ यांनी मनोज जरांगेंना आणखी एक टोला लगावला. आम्ही कुणाला धमक्या देत नाही, तसंच आम्ही कुणाला घाबरतही नाही, असं भुजबळ म्हणाले. यावेळी भुजबळ यांनी पंकजा मुंडे यांच्या पराभवाबाबतही भाष्य केलं. सगळ्यांनी मिळून पंकजा मुंडे यांच्या पराभवाचे कारस्थान रचले, असा आरोप भुजबळ यांनी केला.
सरकारच्या शिष्टमंडळाने घेतली हाकेंची भेट
दरम्यान, वडीगोद्री येथे ओबीसी आरक्षणाच्या बचावासाठी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे उपोषणाला बसले आहेत. आज सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली. यामध्ये छगन भुजबळ, धनजंय मुंडे, गुलाबराव पाटील, उदय सामंत, गोपीचंद पडळकर, गिरीष महाजन हे सर्व नेते उपस्थित होते.
यावेळी भुजबळ यांनी सरकार कुणावरही अन्याय करणार नाही, असं आश्वासन दिलं. तसंच आपल्या मागण्याबाबत सरकार गंभीर आहे, याबाबत सकारात्मक चर्चा झाली आहे, असा विश्वासही यावेळी छगन भुजबळ यांनी हाके यांना दिला. दरम्यान, राज्य सरकारच्या आश्वासनानंतर लक्ष्मण हाके यांनी आपले उपोषण स्थगित केले.



No comments:

Post a Comment