Friday, June 21, 2024

केजरीवाल याना झटका ; जामीनाला स्थगिती ;

वेध माझा ऑनलाइन।
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल  यांना दिल्ली उच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. सध्या उच्च न्यायालयानं अरविंद केजरीवाल यांच्या जामीनाला स्थगिती दिली आहे. सुनावणी पूर्ण होईपर्यंत जामिनावर स्थगिती राहील, असं दिल्ली उच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. दरम्यान, दिल्ली दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात राऊस एव्हेन्यू कोर्टानं काल म्हणजेच, गुरुवारी केजरीवाल यांना नियमित जामीन मंजूर केला होता, मात्र आज ईडीनं केजरीवाल यांच्या जामीनाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली. 

अरविंद केजरीवाल यांच्या जामीनाला  अंमलबजावणी संचालनालयानं (ED) दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. न्यायमूर्ती सुधीर कुमार जैन आणि रविंदर दुडेजा यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी पार पडली. मद्य धोरण घोटाळा प्रकरणाच्या तपासाच्या महत्त्वाच्या टप्प्यावर अरविंद केजरीवाल यांना सोडल्यास तपासावर परिणाम होईल. कारण केजरीवाल हे दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत, असं ईडीनं हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेत म्हटलं आहे.  


No comments:

Post a Comment