वेध माझा ऑनलाइन ; हाडपसर पुणे येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेचा निषेध म्हणून आज कराडात सकल हिंदू समाजाच्या वतीने कोल्हापूर नाका येथे रास्ता रोको करण्यात आला यावेळी काहीकाळ वाहतूक ठप्प झाली होती सकल हिंदू समाजाच्या वतीने यावेळी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले
दरम्यान अशा घटना राज्यात होऊ नयेत यासाठी प्रशासनाने सतर्क राहावे तसेच अशा प्रकारचा गुन्हा करणाऱ्या नराधमाला 10 वर्षे शिक्षेची तरतूद असावी असा कायदा करण्यात यावा पुन्हा असा प्रकार घडल्यास संपूर्ण हिंदू समाज रस्त्यावर उतरेल पोलिसांनी लवकरात लवकर आरोपीस अटक करून त्याच्यावर कडक करवाई करावी अशी मागणी यावेळी सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आली
यावेळी जय भवानी-जय शिवाजी, भारत माता की जय अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता...
दरम्यान आज निघालेल्या सकल हिंदू समाजाच्या मोर्चामध्ये माजी नगरसेवक अण्णा पावसकर विक्रम पावसकर जयवन्त पाटील सौरभ पाटील इंद्रजित गुजर हणमंत पवार हे देखील रस्त्यावर उतरलेले दिसले तसेच शहर व परिसरातील शेकडो युवक, महिला तसेच विविध हिंदू संघटना देखील या मोर्चात सहभागी झालेल्या दिसल्या
दरम्यान या मोर्चासाठी जनतेने सहभागी व्हावे असे आवाहन करणारे अनेक व्हीडिओ कराडातील बऱ्याच जणांनी तयार करून सोशल मीडियावर टाकले होते त्यातील काहीजण या मोर्चात दिसले तर व्हीडिओ करून काहीजण मात्र या मोर्चात स्वतः सहभागी झालेले दिसले नाहीत याची पत्रकारांच्यात चर्चा होती
No comments:
Post a Comment