माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे कट्टर समर्थक, मलकापूर नगरपालिकेचे बांधकाम सभापती श्री. राजेंद्र प्रल्हाद यादव, माजी नगरसेविका सौ. अनिता राजेंद्र यादव, महिला व बालकल्याण सभापती सौ. गीतांजली शहाजी पाटील, नगरसेविका सौ. स्वाती तुपे यांच्यासह मलकापुरातील शेकडो काँग्रेस समर्थक कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला मलकापूर चे काँग्रेसचे नेते मनोहर शिंदे यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून आबांनी काँग्रेस सोडल्याची चर्चा आहे मात्र हा पृथ्वीराज बाबांना त्याठिकाणी मोठा धक्का मानला जातोय
दरम्यान आज मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे व प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्ष प्रवेशाचा सोहळा पार पडला
मलकापुरचे काँग्रेसचे नेते मनोहर शिंदे यांच्याविरोधात नेहमीच एकाधिकारशाही कार्यपद्धतीचा आरोप होत होता आर आबांना मनोहर शिंदे यांची कार्यपद्धती पसंत नव्हती असे बोलले जात होते त्याचीही अनेक कारणे आहेत त्यामुळे ते लवकरात लवकर डॉ अतुल बाबांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या मार्गावर जातील अशा अटकळी बांधल्या जात होत्या आणि मलकापुरातील राजकारणात मोठा स्फोट होणार हेही निश्चित झाले होते
त्यानुसार आज आर आबांनी आपला निर्णय घेत भाजप प्रवेश केला आहे
.
भाजप प्रवेशानंतर राजेंद्र यादव म्हणाले...
मी अनेक वर्षे मलकापुरात काम करतोय. पण गेल्या 10 वर्षात मलकापुराचा विकास खुंटला आहे. या विकासाला गती देण्यासाठी आणि मलकापूरच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे.
दरम्यान यादव यांच्या घरातील सदस्य गेली 23 वर्षे मलकापूर नगरपालिकेत लोकप्रतिनिधी म्हणून काम करत आहेत. ते स्वतः 3 टर्म निवडून आले असून, गेली 10 वर्षे बांधकाम सभापती म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांच्या पत्नी सौ. अनिता पाटील या नगरसेविका म्हणून कार्यरत होत्या. तसेच त्यांचे बंधू अरुण यादव हेदेखील नगरसेवक म्हणून कार्यरत होते. मोठा जनसंपर्क आणि जनसेवेसाठी सदैव तत्पर म्हणून त्यांची ख्याती आहे.तसेच आर आबांची स्वतःची ताकद मलकापुरात आहे त्यांना मानणारा मोठा वर्ग त्याठिकाणी आहे त्यांनी त्यांच्या उंचीने राजकारणात वावरावे अशी त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांची इच्छा होती मात्र मनोहर शिंदेंच्या पालिकेतील व काँग्रेस पक्षामधील कार्यपद्धतीशी जुळऊन घेत ते आबांना शक्य नव्हते आबांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करून डॉ अतुलबाबांचे नेतृत्व स्वीकारले ते आजच भाजपमध्ये प्रवेशकर्ते झाले आहेत
दरम्यान याचा फटका काँग्रेसला त्या ठिकाणी बसणार हे नक्की आहे तर दुसरीकडे डॉ अतुल भोसले याना मोठा राजकीय फायदा त्याठिकाणी होणार असल्याचे जाणकार सांगत आहेत
No comments:
Post a Comment