बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळे या पुन्हा एकदा खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. त्यांनी आपली नणंद आणि अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव केला आहे. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीचे राज्यात वारे वाहू लागले आहेत. येत्या काही महिन्यात विधानसभा निवडणूक लागू शकतात. याचपार्श्वभूमीवर बारामतीत नवा दादा हवा असल्याची चर्चा आहे. याबाबत सुप्रिया सुळेंना विचारलं असता सुप्रिया सुळेंनी त्यावर भाष्य केलं आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळेंचा प्रचार करण्यासाठी युगेंद्र पवार धावत होते. तसेच आता शरद पवार देखील दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करत आहेत. यामुळे आता अजितदादांविरोधात युगेंद्र पवारांना उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. मध्यंतरी शरद पवारांच्या समर्थकांनी देखील बारामतीचा दादा बदलायचा असल्याचं वक्तव्य केलं होतं. तेव्हा शरद पवारांनी यावर आताच बोलणं उचित राहणार नसल्याचं वक्तव्य केलं आहे.
युगेंद्र पवार बारामतीचे नवे दादा?
हा प्रश्न आता सुप्रिया सुळेंना करण्यात आला होता. तेव्हा त्यावर सुप्रिया सुळेंनी उत्तर दिलं आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, युगेंद्र पवार चार वर्षांपासून बारामतीत फिरतोय. विद्या प्रतिष्ठानमध्ये त्याचं चांगलं काम आहे. स्थानिक लोकांचे प्रश्न सोडवत आहे. त्यांचं काम करत आहे. तो फिरतोय म्हणून त्याला उमेदवारी दिली जाईल किंवा नाही, याची चर्चा फार लवकर होत आहे असं मला वाटतं. बघूया आता पुढे काय होईल ते असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.
सध्या शरद पवार हे दुष्काळी दौरे करत आहेत. बारामतीतीत शेतकरी मेळाव्यांना आपली उपस्थिती दाखवत आहेत. त्यावर ते चांगल्या मार्कांनी पास होण्याचा ते प्रयत्न करत असतात. महाविकास आघाडी म्हणून आम्ही चांगल्या मुद्द्यांवर काम करत आहे. मात्र यांचं सरकार आल्यापासून राज्यात असे कोणते चांगले निर्णय घेतले आहेत?, असं म्हणत सुप्रिया सुळेंनी प्रतिसवाल केला आहे.
No comments:
Post a Comment