राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. जरांगे यांनी काही काळासाठी मराठा आंदोलन स्थगित केलं आहे. पण, आता ओबीसी आरक्षण संरक्षणासाठी आंदोलन केलं जात आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे वडीगोद्री येथे उपोषणाला बसले आहेत. आता सर्वांचं लक्ष सरकारच्या भूमिकेकडे लागलं आहे. अशात भाजप नेत्याने थेट शरद पवार यांच्यावर निशाणा साधत गंभीर आरोप केला आहे.
या आरोपांनी महाराष्ट्रातील राजकारण अजूनच तापलं आहे. शरद पवार हे कायम ओबीसी समाजाच्या विरोधात आहेत, असा आरोप भाजपचे ओबीसी नेते डॉ. परिणय फुके यांनी केला आहे. इतकंच नाही तर, मनोज जरांगे यांना पवारांनी पाठबळ दिल्याचंही फुके यांनी म्हटलंय.
परिणय फुके यांचा शरद पवारांवर गंभीर आरोप
“शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका काय राहिली आहे, हे स्पष्ट आहे. शरद पवार यांनी ओबीसींसाठी काहीच केलं नाही. उलट त्यांच्याविरोधात भूमिका घेतली.”, असा आरोप परिणय फुके यांनी केला.तसंच शरद पवार हेच मनोज जरांगे यांना पाठबळ पुरवत असल्याचा गंभीर आरोप देखील परिणय फुके यांनी केलाय. इतकंच नाही तर, जरांगे पाटील यांच्यावर देखील त्यांनी काही आरोप केले आहेत. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळाले तर राज्यात तेढ निर्माण होईल, हेच जरांगे यांना पाहिजे, असं परिणय फुके म्हणाले आहेत.
No comments:
Post a Comment