Saturday, June 15, 2024

कोयना आणि महाबळेश्वरात किती झाला पाऊस ?

वेध माझा ऑनलाइन।
सातारा जिल्ह्यात पावसाने सध्या उघडीप दिली असली तरी जिल्ह्यात आठ दिवसांपूर्वी पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांकडून खरीप हंगामातील पेरणीची कामे केली जाऊ लागली आहेत. दरम्यान, कोयना पाणलोट क्षेत्रात अधून मधून रिमझिम पावसाच्या सरी कोसळत असून शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत नवजा येथे 22 मिलीमीटरची नोंद झाली, तर कोयनेला 23 आणि महाबळेश्वरला 13 मिलीमीटर पाऊस पडला.

मागील चार पाच दिवस झाले पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र, कोयना धरणासह नवजा, महाबळेश्वर या ठिकाणी देखील पावसाची संतधार सुरु आहे. सध्या कोयना धरणाचा पाणीसाठा 15.11 टीएमसी इतका झाला आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रातही पावसाने लावलेल्या हजेरीमुळे भुईमुगासह सोयाबीन आदी बियाणांची ठिकणी, पेरणीची कामे शेतकऱ्यांनी सुरु केली आहेत.
गेल्यावर्षी जिल्ह्यात जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मान्सूनचा पाऊस सुरू झाला हाेता. तरीही २१ जूननंतरच मोठ्या प्रमाणात पावसाला सुरूवात झाली होती. त्यामुळे मागीलवर्षी १२ जूनपर्यंत पाऊस कमी होता. पूर्व भागातील माण, खटाव, फलटण, कोरेगाव या दुष्काळी भागातही दमदार हजेरी लागली आहे. त्यामुळे ओढ्यांना पाणी वाहिले. तसेच बंधाऱ्यातही पाणीसाठा झाला आहे. त्यातच शेत जमिनीत पाणी साठल्याने खरीप हंगामातील पेरण्यांना वेग आला आहे

No comments:

Post a Comment