खासदार उदयनराजे भोसले यांनी चक्क दिवंगत अभिनेते निळू फुले यांची मिमिक्री केल्याचे काल कराडात पहायला मिळाले त्यावेळी उपस्थित जनसमुदायामधून त्यांना टाळ्यांच्या गजरात मोठी वाहवा मिळाली
खासदार उदयनराजे भोसले हे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत साताऱ्यातून चांगल्या मतांनी निवडून आले आहेत त्यानिमित्ताने त्यांचा जिल्ह्यात आभार दौरा सुरू आहे कराड दक्षिणमधील नारायणवाडी याठिकाणी ते या दौऱ्यानिमित्त आले असता त्यांनी आपल्या भाषणातून निळू फुले यांची मिमिक्री केली
डॉ अतुल भोसले यांनी कराड दक्षिणमधून खासदार उदयनराजे भोसले यांना मोठे मताधिक्य देत आपली ताकद दाखवून दिली आहे त्यांचे कौतुक करताना अतुल भोसले यावेळी आमदार होणार आणि 100 मार्कानी पास होऊन आमदार होणार हे सांगण्यासाठी त्यांनी निळू फुले यांच्या एका चित्रपटातील प्रसंग लोकांसमोर उभा केला यावेळी त्यांनी ही मिमिक्री सादर केली
No comments:
Post a Comment