वेध माझा ऑनलाइन ।स्वर्गीय जयवंतरावजी भोसले आप्पा यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त भाजपचे माजी नगरसेवक सुहास जगताप आणि नागरी आरोग्य केंद्र कराड यांच्या संयुक्त विद्यमाने सुहास जगताप यांच्या निवासस्थानी महिलांसाठी बीपी व शुगर चेक अप कॅम्पचे मोफत आयोजन करण्यात आले.
या कॅम्पचा शुभारंभ प्राध्यापक वी के कुलकर्णी सर सौ शीला कुलकर्णी मॅडम योगगुरु वनमाला जोशी मॅडम सौ मनीषा व संजय शेटे श्री महेंद्र कुलकर्णी श्री नंदकुमार ढवळीकर काका यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जयवंतराव भोसले यांच्या सहकार क्षेत्रातील कार्यासह एकुणच सामाजिक कार्याला उजाळा देण्यात आला तसेच जयवंतराव भोसले यांना अभिवादन करण्यात आले
दरम्यान नागरी सुविधा केंद्राकडून शीला गुरव मनाली जोशी ललिता फल्ले गायत्री कांबळे आलिया कादरी मॅडम या सर्वांचे सहकार्य लाभले.यावेळी डेंगू मलेरिया साथी बद्दल माहिती देण्यात आली तसेच गरोदर महिलांसाठी असणाऱ्या योजनांचीही माहिती यावेळी देण्यात आली.
No comments:
Post a Comment