अजित पवारांच्या नेतृत्वात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री पुन्हा एकदा पक्षांतराच्या तयारीत आहे अशी चर्चा आहे.
पक्षातील अंतर्गत सूत्रांच्या मते ७६ वर्षीय छगन भुजबळ हे नाराज असून अनेक पर्यायांचा विचार करत आहेत. दोन पर्यायांपैकी एक पर्याय ते स्वीकारतील असं दिसतं आहे. त्यातला पहिला पर्याय स्वतःचा पक्ष स्थापन करणार किंवा दुसरा पर्याय म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाणार. असं घडलं तर महाराष्ट्रातल्या राजकारणातलं एक वर्तुळ पूर्ण होईल. कारण साधारण तीन दशकांपूर्वी छगन भुजबळ यांनी पहिलं बंड शिवसेनेतच केलं होतं. त्यानंतर ते काँग्रेसमध्ये गेले होते.
No comments:
Post a Comment