देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. बँकेकडून मार्जिनल कॉस्ट ऑफ फंडबेस्ड लेंडिंग रेट (MCLR) मध्ये वेगवेगळ्या कालावधीसाठी 10 बेसिस पॉईंट्स (0.1%) वाढ करण्यात आली आहे.
या वाढीनंतर कर्ज घेणं महागणार आहे. तसंच कर्जाचा मासिक हप्ताही जास्त भरावा लागणार आहे. याचे नवे दर आज 15 जूनपासूनच लागू होणार आहे. एमसीएलआरमध्ये वाढ झाल्याने एमसीएलआर 8.65 टक्क्यांवरून 8.75 टक्क्यांवर गेला आहे.
घर आणि वाहन कर्जासह बरेच किरकोळ कर हे एक वर्षाच्या एमसीएलआर दराशी जोडलेली असतात. आता हे दरच वाढल्याने त्याचा परिणाम हा कर्जावरही होणार आहे. या व्यतिरिक्त दोन वर्षांचा एमसीएलआर8.75 टक्क्यांवरून 8.85 टक्के करण्यात आला आहे.
एमसीएलआर म्हणजे नेमकं काय?
MCLR हा एक बेंचमार्क व्याज दर (SBI MCLR Rates) आहे, ज्यानुसार सर्व बँका त्यांच्या ग्राहकांना गृह कर्ज, वाहन कर्जासह विविध कर्जे देतात. बँका या व्याजदरापेक्षा कमी दराने कर्ज देत नाहीत.
बेस रेट आणि BPLR दरातही बदल
याशिवाय स्टेट बँक ऑफ इंडियाने बेस रेटदेखील बदलला आहे. नवीन बेस दर 10.40 टक्के आहे, जो आजपासून (15 जून 2024) लागू होईल. यासोबतच, SBI बेंचमार्क प्राइम लेंडिंग रेट (BPLR) आजपासून 5.15% प्रतिवर्ष करण्यात आला आहे.
दरम्यान, आरबीआयचा रेपो रेट किंवा ट्रेझरी बिल यील्ड सारख्या बाह्य बेंचमार्कशी संबंधित कर्ज असलेल्या कर्जदारांवर एमसीएलआर वाढीचा कोणताही परिणाम होणार नाही.
No comments:
Post a Comment