यापुढे इस्लामपूर-वाळवा मतदारसंघावर देखील आपले दसपटीने लक्ष राहील आणि या मतदारसंघात आता नवीन निर्णय घ्यावे लागतील, अशा शब्दात सांगलीचे खासदार विशाल पाटील आणि काँग्रेसचे आमदार डॉ.विश्वजित कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना अप्रत्यक्ष इशारा दिला.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. पाटील यांच्या इस्लामपूर- वाळवा मतदार संघातल्या कसबे डिग्रज येथे आयोजित सत्कार समारंभात दोघे बोलत होते.
खासदार पाटील यांचा आ. कदम यांच्या उपस्थितीत त्याठिकाणी सत्कार आयोजित करण्यात आला होता.
विशेष म्हणजे सांगली लोकसभा मतदार संघात नसणारे कसबे डिग्रज हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मतदारसंघातील गाव आहे.
No comments:
Post a Comment