कराड शहर तसेच ग्रामिण भागातील मुस्लिम बांधवानी ईदगाह मैदानावर न येता आपआपल्या नजीकच्या मस्जिदमध्ये नमाज अदा करावी पावसाचे वातावरण असल्यामुळे उद्या सोमवार दि. 17 जून रोजी ईद उल- अजहा (बकरीद ईद) ची नमाज "ईदगाह" मैदानावर होणार नाही अशी माहिती शाही वक्फ कब्रस्तान ईदगाह,कराड यांच्याकडून देण्यात आली आहे.
दरम्यान उद्या होणाऱ्या सामुदायिक नमाज पठनासाठी शाही वक्फ कब्रस्तान ईदगाह व कराड नगरपरिषदे कडून गेली दोन दिवस मैदानावर तयारी करण्यात आली होती. मात्र ऐनवेळी पावसाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे ईदगाह मैदानावर उद्या होणारी सामुदायिक प्रार्थना रद्द करण्यात आली असल्याची माहिती शाही वक्फ कब्रस्तान ईदगाह यांच्याकडून देण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment