Sunday, June 9, 2024

शंभूराजे देसाई म्हणाले... मंत्रिपदातुन मला मुक्त करा...ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख हर्षद कदम म्हणाले...शंभूराज देसाई केवळ स्टंट करतात...ते राजीनामा देणार नाहीत...

वेध माझा ऑनलाइन
राजीनामा देण्याचा पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा केवळ स्टंट असून गद्दारी करून मिळवलेले मंत्रिपद यांच्याकडून सुटणं अशक्य आहे..तुम्ही खरंच स्वाभिमानी असाल तर राजीनामा द्याच... असा घणाघात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे सातारा जिल्हाप्रमुख हर्षद कदम यांनी केला आहे...

पाटण भागात उदयनराजे भोसले याना मताधिक्य देऊ न शकल्याने आपल्याला मंत्रिपदातुन मुक्त करा असे आपण मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे सांगणार असल्याचे ना शंभूराज देसाई यांनी मरळी पाटण येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात म्हटलं आहे त्यावर सोशल मिडियावर हर्षद कदम यांनी आपली प्रतिक्रिया व्हायरल केली आहे

दरम्यान, राजीनामा देण्याचा पालकमंत्र्यांकडून केवळ स्टंट केला जात असून...गद्दारी करून मिळवलेले हे मंत्रीपद यांच्याकडून सुटणार नाही ते खरंच स्वाभिमानी असतील तर राजीनामा देतील..पालकमंत्र्यांनी तालुक्यात कागदोपत्री केलेल्या खोट्या कामाची जनतेने दिलेली ही पोचपावती असून येत्या चार महिन्यात विधानसभेला लोकच यांना राजीनामा द्यायला लावतील असेही हर्षद कदम म्हणाले आहेत

No comments:

Post a Comment