Saturday, June 15, 2024

शिखर बँक घोटाळा प्रकरणी अण्णा हजारें यांचा मोठा गौप्यस्फोट!;

वेध माझा ऑनलाईन
शिखर बँक घोटाळा प्रकरणामुळे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अडचणी आणखी वाढल्याचं बोललं जात होतं. कारण या घोटाळ्या प्रकरणी  ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी क्लोजर रिपोर्टवर आक्षेप घेत याचिका दाखल केल्याची बातमी होती. आता यावर अण्णा हजारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अण्णांनी क्लोजर रिपोर्ट याचिकांसदर्भात मोठा गौप्यस्फोट केला आहे. ते राळेगणसिद्धीमध्ये बोलत होते.


याप्रकरणी माझा कुठलाही संबंध नसून माझ्या नावाचा दुरुपयोग करुन काही लोक स्वार्थ साधत असल्याचं ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे. मी कुठलीही याचिका दाखल केली नसल्याचं अण्णांनी म्हटलं.
अण्णा हजारे यांनी आक्षेप घेत निषेध याचिका दाखल करण्यासंदर्भात वेळ घेतला अशा बातम्या प्रसारित झाल्या होत्या. मात्र, या संदर्भात माझा कुठलाही संबंध नसून माझ्या नावाचा दुरुपयोग करुन काही लोक स्वार्थ साधत असल्याचं ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे.
या अर्जाचा आणि माझा कुठलाही संबंध नाही. या प्रकरणात कोणी काय केलं, मला माहित नाही. या याचिकेत माझंही नाव होतं. त्यामुळे अर्ज करण्याआधी मला विचारायला हवं होतं. परंतु, असं झालं नाही त्यामुळे हे चुकीचं असल्याचं मत अण्णा हजारे यांनी व्यक्त केलं आहे.

 

No comments:

Post a Comment