Friday, June 21, 2024

बच्चू कडू यांच्या जीवाला धोका ;बच्चू कडू यांनी लिहिले पोलिसांना पत्र - बातमीने खळबळ ;

वेध माझा ऑनलाइन
प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक आणि अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बच्चू कडू यांनी जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकांना पत्र लिहीले आहे. या पत्राद्वारे त्यांनी त्यांच्या जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे. माझा अपघात झाल्याची अफवा पसरवली जात असल्याचेही बच्चू कडू यांनी म्हटले आहे. गोपनीय माहितीनुसार, माझ्या जिवीताला धोका आहे, असं बच्चू कडू यांनी पोलिसांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. माझा अपघात झाला अशा प्रकारचे नागरिकांचे फोन येत आहेत. अपघात झाल्याची कोणीतरी अफवा पसरवत आहे, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. या प्रकरणानंतर सखोल चौकशी करून संबधितांवर गुन्हा दाखल करून त्यांना जेरबंद करण्याची बच्चू कडूंनी मागणी केली आहे. बच्चू कडू यांच्या जीवाला धोका असल्याच्या बातमीने खळबळ उडाली आहे.

No comments:

Post a Comment