देशभरात पुण्यातील कल्याणीनगर पोर्शे कार अपघात प्रचंड गाजला आहे. कल्याणीनगर परिसरात एका अल्पवयीन धनिकपुत्राने पोर्शे कारने दोन तरुणांना चिरडल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना घडली होती. या दुर्घटनेनंतर येरवाडा पोलीस, ससून रुग्णालयातील डॉक्टर व आरोपीच्या वडिलांनी त्यांच्या मुलाला वाचवण्यासाठी पूर्णपणे सापळा रचला होता. मात्र आता या प्रकरणाची चौकशी सखोल तपासणी करण्यात आली आहे.
अनिल देशमुखांचे ट्विट
पोर्शे कार अपघात प्रकरणामुळे नागरिकांनी देखील प्रचंड रोष व्यक्त केला होता. त्यानंतर आता राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील राज्य सरकारवर एक गंभीर आरोप केला आहे. या पोर्शे कार अपघात प्रकरणात आरोपीच्या वडिलांनी त्याच्या मुलाला वाचवण्यासाठी आणखी एक षडयंत्र रचण्यात आल्याचे अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये अनिल देशमुख यांनी म्हटले आहे की, पुणे हिट ॲन्ड रन प्रकरणामध्ये राजकीय दबाव आणून आरोपीचे रक्ताचे नमुने बदलून आरोपी दारु न पिल्याचा अहवाल तयार करण्याचे प्रयत्न झाले हे स्पष्टपणे उघड झाले आहे.
प्रकरणात नवा ट्विस्ट :
यासंदर्भात माजी गृहमंत्री म्हणुन माझी माहिती अशी आहे की, मृतकांच्या रिपोर्ट मध्ये Alcohol +ve यावे याकरिता आता पूर्णपणे तयारी देखील झाली आहे. जेणेकरुन या प्रकरणामध्ये मृत झालेले दोघे तरुण-तरुणी हे दारु पिऊन होते आणि त्यांच्यामुळेच हा अपघात झाला असे न्यायालयात देखील सिद्ध करता येईल.कारण या प्रकरणातील आरोपी मुलगा लवकर सुटेल, अशा पध्दतीने सध्या प्रयत्न सरु आहेत असा धक्कादायक आरोप माजी मुख्यमंत्री आरोप अनिल देशमुख यांनी केला आहे.
No comments:
Post a Comment