Saturday, June 22, 2024

अब जंग लगी तलवार पर धार लगानी होगी, कुछ लोग अपनी औकाद भुल गए, ; छगन भुजबळ यांचे तडाखेबाज भाषण / वाचा बातमी...

वेध माझा ऑनलाइन ।
ओबीसी आरक्षणाच्या बचावासाठी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे वडीगोद्री येथे उपोषणाला बसले आहेत. आज सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली. यामध्ये छगन भुजबळ, धनजंय मुंडे, गुलाबराव पाटील, उदय सामंत, गोपीचंद पडळकर, गिरीष महाजन हे सर्व नेते उपस्थित होते.
यावेळी भुजबळ यांनी जोरदार भाषण करत मनोज जरांगे पाटील यांच्यावर हल्लाबोल केला. तसंच आक्रमक भाषेत त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला. त्यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत शेरोशायरी करत ओबीसी आंदोलकांना ऊर्जा दिली.

छगन भुजबळ म्हणाले...
“अब जंग लगी तलवार पर धार लगानी होगी, कुछ लोग अपनी औकाद भुल गए, शायद अपनी याद उनको दिलानी होगी’, असं भुजबळ यांनी म्हणताच ओबीसी आंदोलकांमध्ये एक ऊर्जा दिसून आली. तसंच यावेळी त्यांनी जरांगे पाटील यांच्यावर जोरदार प्रहार केला.
“औकीतत राहा बेट्या हो..आम्ही शांत बसलो म्हणजे गरीब आहोत. आम्ही जनावरं नाही, कुठेही न्यावं. ते माकडं म्हणतंय भुजबळांना जमानतीवर सोडलं. अरे काय बोलतो त्याला कळत नाही. काय बोलावं कुठं बोलावं कळत नाही. मी त्याला बोलण्याऐवजी हाकेंसोबत त्याने चर्चा करावी मग आमच्याकडे यावं.”, असं भुजबळ म्हणाले.
“..तर ओबीसी लोकसभा आणि विधानसभेतही आरक्षण मागतील”
तसंच पुढे ते म्हणाले की, “तुम्ही सांगाल तेच करायचं, ही दादागिरी थांबवा. लक्षात ठेवा कोणी म्हणेल, आम्ही ओनर आहोत. सरकारमध्ये आणि विधानसभेत आम्ही जास्त आहोत, म्हणजे यांना दाबू, असे काहींना वाटत असेल. पण संबंधितांनी हा गैरसमज मनातून काढून टाकावा.”, असं ठणकावून भुजबळ यांनी सांगितलं.
पुढे त्यांनी आरक्षणाच्या मुद्यावरही भाष्य केलं. “आम्ही लोकसभेवर जायचे नाही, विधानसभेवर जायचे नाही. अधिकार क्षेत्रात तुमचे 10-20 जण आणि आमचा एकही नको?, असंच जर चालू राहिलं तर विधानसभा आणि लोकसभेतही आम्हाला आरक्षण हवं, अशी मागणी करावी लागेल. लढाई अजून संपलेली नाही, तर ती सुरु झाली आहे.”, असं भुजबळ म्हणाले आहेत.



No comments:

Post a Comment