Saturday, June 15, 2024

पिम्परी चिंचवडच्या भाजपच्या आमदार अश्विनी जगताप यांच्या घरातच वाद ; अश्विनी जगताप यांचे दीर शंकर जगताप यांचा आता उमेदवारीचा दावा ;

वेध माझा ऑनलाइन।
पिंपरी- चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघांवर राष्ट्रवादी अजित पवार गटाने दावा केला आहे. चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. त्यामुळे या दोन जागांवरून महायुतीत रस्सीखेच होण्याची शक्यता आहे.

पिंपरी-चिंचवडच्या जागेवर भाजपच्या आमदार अश्विनी जगताप यांच्या घरातच वाद असल्याचं समोर आलं आहे. अश्विनी जगताप यांचे दीर आणि पिंपरी चिंचवडचे भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी या जागेवर दावा केला आहे.

 मीच खरी उत्तराधिकारी”
भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगतापांच्या पत्नी अश्विनी जगताप यांच्या जागेवर दीर शंकर जगतापांनी दावा ठोकला आहे. पण लक्ष्मण जगतापांची मीच खरी उत्तराधिकारी आहे, असं म्हणत मी आगामी चिंचवड विधानसभा लढणार असं ठामपणे अश्विनी जगताप यांनी म्हटलंय.
प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. प्रत्येकाला व्यक्तीस्वातंत्र्य आहे. ही लोकशाही आहे. दिवंगत आमदार लक्ष्मण जगतापांची उत्तराधिकारी मीच दावेदार असणार आहे. साहेबानंतर मलाच पक्षाने मान दिला होता. त्यानंतर साहेबांची जी कामे अपूर्ण होती, ती मी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे, असं त्या म्हणाल्यात.

 शंकर जगताप निवडणूक लढवण्यास इच्छुक
राष्ट्रवादीने जरी भोसरी आणि चिंचवड विधानसभा क्षेत्रावर दावा केला असला तरी या दोन्ही जागा भाजपकडेच आहेत आणि भाजपकडेच राहतील. सध्या ज्या जागांवर ज्या पक्षाचा आमदार आहे. त्या जागा महायुती त्याच पक्षाकडे असतील असा फॉर्मुला महायुती ठरला आहे, असं ते म्हणाले.मी स्वतः चिंचवड विधानसभा क्षेत्रातून भाजपकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे, अशी इच्छा शंकर जगताप यांनी व्यक्त केली आहे.


No comments:

Post a Comment