वेध माझा ऑनलाइन।
यंदाच्या T20 विश्वचषक स्पर्धेत भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत वर्ल्डकप जिंकला. अतिशय रोमहर्षक आणि थरारक सामन्यात भारताने बाजी मारत वर्ल्डकपवर आपलं नाव कोरल. एकीकडे चाहते या विजयाचा आनंद साजरा करत असतानाच विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या निवृत्तीमुळे क्रिकेटप्रेमींना मोठं दुःख सुद्धा होत आहे. विराट कोहलीनंतर कर्णधार रोहित शर्मानेही T20 क्रिकेट मधून निवृत्ती जाहीर केली आहे. आयसीसीने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर रोहितच्या निवृत्तीबाबत माहिती दिली आहे.
अंतिम सामन्यानंतर पत्रकार परिषदेत रोहित म्हणाला होता, “हा माझा शेवटचा सामना होता. निरोप घेण्यासाठी यापेक्षा चांगली वेळ असूच शकत नाही. मला ती (ट्रॉफी) हवी होती. हे शब्दात मांडणे खूप कठीण आहे. मला हेच हवे होते आणि हेच घडले. मी माझ्या आयुष्यात यासाठी खूप हताश होतो. यावेळी आम्ही मर्यादा ओलांडली याचा आनंद झाला. असं म्हणत रोहित शर्माने T20 मधून निवृत्ती जाहीर केली. विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोन्ही दिग्गज खेळाडूंनी एकाच वेळी निवृत्ती जाहीर केल्याने भारतीय क्रिकेटला हा मोठा धक्का आहे.
No comments:
Post a Comment