वेध माझा ऑनलाइन।पोस्ट ऑफिसच्या योजना गरिबांसाठी फारच फायदेशीर आहेत. कारण पोस्ट ऑफिसमध्ये रिस्क फ्री योजना असतात. यामुळे याचा फायदा हा गरिबांना होतो. शेअर मार्केट आणि खासगी बँकांच्या तुलनेत पोस्ट ऑफिसच्या योजना या फार फायदेशीर असतात. सर्वसामान्याचा कल हा आपले पैसे सुरक्षित राहावे याकडे असतो. याचा नक्कीच फायदा गुंतवणूकदारास होताना दिसतो.
पोस्ट ऑफिसची एक योजना आहे. सध्या त्या योजनेची जोरदार चर्चा होताना दिसतेय. ज्यात ग्राहकांना रोज फक्त 95 रुपये भरावे लागतात. गुंतवणूकदराने गुंतवलेल्या पैशातून मिळणारा परतावा हा तब्बल 14 लाखांपर्यंत आहे.
ग्राम सुमंगल ग्रामीण डाक जीवन विमा योजना असं या योजनेचं नाव आहे. या योजनेतून पैसा काढता येत नाही. पण मॅच्युरिटीनंतर 14 लाख रुपये तुमच्या खात्यावर मिळणार आहेत. गुंतवणूकदाराचा मृत्यु झाला. तसेच योजनेत वारस असणाऱ्यास 10 लाख रूपये मिळू शकतात. त्यावेळी किती हप्ते भरले होते. त्यावर ही रक्कम अवलंबून आहे.
या योजनेत पुरूष आणि महिला कोणीही या योजनेत पैसे गुंतवू शकतात. तुम्हाला तुमच्या भागातील पोस्टात जाऊन खातं उघडायचं आहे. या योजनेसाठी फॉर्म भरायचा आहे. या योजनेत तुम्ही भरणार की तुमच्या खात्यातून पैसे वजा होणार. याबाबतची माहिती आता पोस्टातील कार्यालयात द्यायची आहे.
या योजनेमध्ये गुंतवणूकदाराचं वय हे 19 ते 45 असावं. या योजनेत तुम्ही 20 वर्षांपर्यंत पैसे गुंतवू शकता. आवश्यक त्या कागदपत्रांसह तुम्ही तुमच्या पोस्टा ऑफिसमध्ये जाऊन ही योजना लगेच सुरू करू शकता.
No comments:
Post a Comment