Friday, June 21, 2024

निवडणूक आयोगाकडून विधानसभेची तयारी सुरू ; सप्टेंबर, ऑक्टोंबरमध्ये निवडणुका ; मोठी बातमी...

वेध माझा ऑनलाइन।
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर देशात नवीन सरकार सत्तेवर आले. दोन महिन्यांपेक्षा दीर्घ काळ लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरु होती. एकूण सात टप्प्यात ही निवडणूक होती. १९ एप्रिलपासून मतदान सुरु झाले. त्यानंतर ४ जून रोजी मतमोजणी झाली. आता लोकसभा निवडणुकीनंतर निवडणूक आयोग पुन्हा कामाला लागले आहे. निवडणूक आयोगाने महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड आणि जम्मू काश्मीर राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी पहिले पाऊल उचलण्यात आले आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून विधानसभेची तयारी सुरू करण्यात आली. आयोगाने महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड आणि जम्मू काश्मीर राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदार याद्या अद्ययावत करण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे. घरोघरी जाऊन मतदार याद्या अदयावत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मतदान केंद्राच्या अडचणी दूर केल्या जाणार आहेत.

२०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २१ ऑक्टोबर २०१९ रोजी झाली होती. राज्यातील सर्व २८८ जागांसाठी मतदान झाले. २४ ऑक्टोबर २०१९ रोजी निकाल जाहीर झाले. त्या निकालानंतर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्या महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले होते. परंतु भाजप आणि शिवसेनेत मुख्यमंत्रीपदावरुन मतभेद निर्माण झाले. त्यानंतर कोणत्याही पक्षाला सरकार बनवता न आल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. जवळपास दोन महिने राष्ट्रपती राजवट होती. त्यानंतर २३ नोव्हेंबर २०१९ देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. परंतु या सरकारला बहुमत सिद्ध करता आले नाही. त्यानंतर २८ नोव्हेंबर २०१९ रोजी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने महाविकास आघाडी निर्माण झाली आणि राज्यात उद्धव ठाकरे यांचे युग सुरु झाले.

No comments:

Post a Comment