Thursday, June 27, 2024

पुण्यातील "त्या' घटनेचा कराडच्या मुस्लिम समाजाच्या वतीने तीव्र निषेध ;पोलिसाना निवेदन;

वेध माझा ऑनलाइन।
हडपसर (पुणे) येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाची विकृत मनोवृत्तीच्या माथेफिरुने विटंबना केल्याची घटना उघडकीस आली आहे. सदरच्या घटनेचा व संबंधित माथेफिरुचा कराड मुस्लिम समाजाच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला. या विकृतावर कठोरात कठोर कारवाई करावी या मागणीचे निवेदन प्रांतअधिकारी व पोलीस निरीक्षकांना देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, शिवरायांनी सर्व समाजाला एकत्र घेऊन न्यायाचे व समतेचे स्वराज्य निर्माण केले. म्हणून सर्वांच्याच मनात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आदर व आपलेपणाची भावना आहे. मात्र विकृत विचारांच्या काही व्यक्ती समाजात अस्थिरता व अशांतता पुरवण्याच्या दुष्ट हेतूने समाजाच्या भावना पायदळी तुडवण्याचे दुष्कृत्य करु पहात आहेत. 

हडपसर येथील दुष्कृत्य करणारास कठोरात कठोर कारवाई करून आयुष्याची अद्दल घडवावी तसेच महापुरुषांचा अवमान किंवा विटंबना करणार्‍यांना किमान 10 वर्षे सकतमजुरीची शिक्षा देण्यात यावी.सदरचे खटले जलदगती न्यायालयात चालवले जावेत अशीही मागणी यावेळी करण्यात आली.

यावेळी बरकत पटवेकर, बशीर कारभारी, इम्तियाज बागवान, अहमद मोमीन, मोसम सय्यद, जाबीर वाईकर, इम्रान मुजावर, उमर फारुक सय्यद,  फिरोज मुजावर आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment