येथील य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी कामगार हिताला प्राधान्य देत, एप्रिल २०२६ पासून कामगारांना तब्बल १४.९१ टक्के पगारवाढ दिली आहे. चेअरमन डॉ. भोसले यांनी गेल्या ११ वर्षात तब्बल ७ वेळा कामगारांना पगारवाढ दिली असून, यामुळे कामगार वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कृष्णा कारखान्याने ऊस गाळप, साखर उत्पादन, तंत्रज्ञानाचा वापर आणि आर्थिक व्यवस्थापन यामध्ये सातत्याने प्रगती साधताना कामगार कल्याणालाही प्राधान्य दिले आहे. चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी कारखान्याच्या प्रगतीत कामगार-कर्मचाऱ्यांचे योगदान लक्षात घेऊन, त्यांच्यासाठी वेळोवेळी कल्याणकारी निर्णय घेतले आहेत. गेल्या ११ वर्षात कामगारांसाठी विविध उपक्रमांच्या आयोजनासह, वैद्यकीय, शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देत चांगली पगारवाढ देण्याबाबत वेळोवेळी धोरणात्मक निर्णय घेतले आहेत.
चेअरमन डॉ. भोसले यांनी सन २०१६ ते २०२५ या कार्यकाळात कामगारांना ६ वेळा पगारवाढ केली. नुकतीच त्यांनी सातव्यांदा पगारवाढ देत, एप्रिल २०२६ पासून कामगारांना १४.९१ टक्के पगारवाढ दिली आहे. यामुळे कामगारांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच कारखान्याविषयी कामगार वर्गात आत्मीयता आणि विश्वास वृद्धिंगत झाला आहे.
डॉ सुरेश भोसले म्हणाले...
य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखाना हा ऊस उत्पादक शेतकऱ्यांबरोबरच, कामगारांच्याही हिताचा विचार करणारा कारखाना म्हणून ओळखला जातो. गेल्या ११ वर्षांत सातत्याने पगारवाढ देऊन आम्ही कामगारांच्या आर्थिक स्थैर्याला हातभार लावण्याचे काम केले आहे. येत्या काळातही कामगारांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबविण्याचा आमचा मनोदय आहे.
----------------------------------------------------------
गेल्या ११ वर्षात ७ वेळा पगारवाढ
जानेवारी २०१६ : ९.९३ टक्के
नोव्हेंबर २०१६ : २०.५६ टक्के
डिसेंबर २०१९ : १०.७८ टक्के
मार्च २०२१ : १५.६५ टक्के
ऑक्टोबर २०२३ : ११.५७ टक्के
ऑक्टोबर २०२५ : १२ टक्के
एप्रिल २०२६ : १४.९१ टक्के
No comments:
Post a Comment