Monday, May 4, 2026

बारामती पोटनिवडणुकीत पहिल्या फेरी अखेर कोणाला किती मते ? अभिजित बिचुकले याना 7 मते...करुणा मुंडेंना 10... तर, सुनेत्रा पवार यांना किती मते ? एकूण 23 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात;

वेध माझा ऑनलाइन।
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर बारामती विधानसभेची जागा रिक्त झाली. त्यानंतर बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत अजित पवार यांच्या पत्नी आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. सध्या निवडणुकीची मतमोजणी सुरू असून सुनेत्रा पवार 26 हजार 773 मतांची मोठी आघाडी घेतली आहे. तर त्यांच्याविरोधात तब्बल 23 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. करुणा मुंडे आणि अभिजीत बिचुकलेसुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांना किती मतं मिळाली?     

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू झाली असून, पहिल्या फेरीअखेर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी 6500 मतांची आघाडी घेतली आहे. बारामती पोटनिवडणुकीसाठी मतदारांमध्ये निरुत्साह राहिल्याने सुमारे 58.27 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. गेल्या निवडणुकीत 71.86 टक्के मतदान झालेलं. या मतदारसंघात तीन लाख 84 हजार 579 मतदार असून, त्यापैकी दोन लाख 24 हजार 87 मतदारांनी मतदान केलं. टपाली मतदान आणि मतमोजणीची पहिली फेरी पूर्ण झाल्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी 6500 मतांची आघाडी घेतलेली. तर, आता तिसऱ्या फेरीअखेर सुनेत्रा पवार 26 हजार 773 मतांनी आघाडीवर आहेत. आता 36377 मतांनी चौथ्या फेरीअखेर सुनेत्रा पवार आघाडीवर आहेत.

(पहिल्या फेरीत, किती मतं?)

सुनेत्रा पवार : 8828 मतं
करुणा मुंडे : 10 मतं
अभिजीत बिचुकले : 7 मतं
नोटा : 28

दुसऱ्या फेरी अखेरची मतं
सुनेत्रा पवार : 16543 मतं
अभिजीत बिचुकले : 15 मतं
करुणा मुंडे : 18 मतं
चंद्रकांत वाघमोडे : 5 मतं
नोटा : 48 मतं

आत्तापर्यंत मोजून झालेली मते : 16843 मतं
 

No comments:

Post a Comment