ज्येष्ठ साहित्यिक श्रीनिवास कुलकर्णी यांना कराड नगरपालिकेतर्फे मानपत्र प्रदान करून त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष व शहरातील आजी माजी नगरसेवक मुख्याधिकारी उपस्थित होते
श्रीनिवास कुलकर्णी यांना राज्य शासनाच्या वतीने साहित्य क्षेत्रातील मानाचा विं. दा. करंदीकर जीवनगौरव पुरस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तेदेण्यात आला आहे. यानिमित्त कराड नगरपालिकेने सर्वसाधारण सभेत कृलकर्णी यांच्या अभिनंदनाचा ठराव करून मानपत्र देण्याचा निर्णय घेतला होता.
मंगळवारी नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, उपनगराध्यक्ष प्रतापराव साळुंखे,लोकशाही आघाडीचे अध्यक्ष जयंतकाका पाटील, मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांनी शहरातील आजी- माजी नगरसेवकांसाहित श्रीनिवास कृलकर्णी यांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन मानपत्र प्रदान केले, स्मृतिचिन्ह,शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला.
सन्मानाबद्धल प्रतिक्रिया व्यक्त करताना उदयन कुलकणी म्हणाले की, वडीलश्रीनिवास कलकर्णी हे नोकरीच्या निमित्ताने कराडला आले. १९६५ साली त्यांची डोह ही कादंबरी प्रकाशित झाली, ती बाचून यशवंतराव चब्हाण यांनी त्यांनाबोलावून घेतले, पूढ़े हा स्नेह वाढत गेला. कुलकर्णी यांच्या कादंबरीस पहिला राज्यपुरस्कार मिळाला, त्याविळी तत्कालीन नगराध्यक्ष पी. डी. पाटील यांनी त्यांचानगरपालिकेतर्फ सत्कार केला. आज पुन्हा नगरपालिकेतर्फ सत्कारा होत आहे.यशबंतराव च्हाण याच्यामुळेच बडिलांना धर मिळाले कराडशी आमचा ऋणकायम राहिला आहे.
राजेंद्रसिंह यादव म्हणाले की, श्रीनिवास कुलकर्णीं हे कराड शहराच्या साहित्य क्षेत्रातील अमूल्य ठेवा आहेत. त्यांची साहित्य क्षेत्रातील कामगिरी शहरासाठीगौरवास्पद आहे. उत्तम साहित्यकृती त्यांनी निर्माण केल्या. शहरातील दोन साहित्यसंमेलनात त्यांचा सक्रीय सहभाग होता, त्यांचे साहित्य क्षेत्रातील योगदानमूषणावह असून शासनानेही त्यांचा उचित सन्मान केला आहे.कराड नगरपालिकेनेही शहराच्या या सुपुत्रास मानपत्र देऊन गौरविले आहे.
सौरभ पाटील यांनी मानपत्राचे वाचन केले
No comments:
Post a Comment