वेध माझा ऑनलाईन।
महायुतीमधील विधान परिषद जागावाटपाचा तिढा अखेर सुटण्याच्या मार्गावर असल्याची माहिती समोर येत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाल्याचं सांगितलं जात असून भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील चर्चांना आता अंतिम टप्पा आला आहे. विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील एकूण 17 जागांसाठी निवडणूक होणार आहे. या जागावाटपावरून महायुतीतील तीनही पक्षांमध्ये गेल्या काही दिवसांपासून जोरदार रस्सीखेच सुरू होती. विशेषतः भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्ये काही जागांवरून मतभेद असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, महायुतीच्या फॉर्म्युल्यात भाजपच्या वाट्याला तब्बल 10 जागा जाण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपने मोठं यश मिळवल्यामुळे या जागांवर भाजपचा वरचष्मा राहणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. मात्र शिवसेना शिंदे गटानेही आपल्या वाट्याच्या जागांबाबत आक्रमक भूमिका घेतल्यामुळे चर्चेत पेच निर्माण झाला होता.
मिळालेल्या माहितीनुसार,
भाजप सोलापूर, अहिल्यानगर, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, वर्धा, चंद्रपूर-गडचिरोली आणि भंडारा-गोंदिया या जागांवर निवडणूक लढवणार आहे.
तर
शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला ठाणे, नाशिक आणि यवतमाळ या जागा जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पुणे आणि रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग या जागांवर दावा ठोकणार असल्याचं समोर आलं आहे.
No comments:
Post a Comment