संस्थापक आणि सहकार पॅनेल यांच्यामधील दोन्ही बाजूंचा अभ्यास करूनच सहकार पॅनेलला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे डॉ इंद्रजित मोहिते आज म्हणाले ते म्हणाले “सहकार पॅनेलकडे कारखाना टिकवण्याची क्षमता आणि व्यवस्थापनाची दृष्टी दिसते. त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत या निवडणुकीत उभे राहत आहोत,
तर दुसरीकडे डॉ इंद्रजित मोहिते यांनी अविनाश मोहितेच्या अकार्यक्षमतेचा या पत्रकार परिषदेत पाढाच वाचला...
कारखाना चालवण्यासाठी चांगले नेतृत्व असावे लागते,त्या नेतृत्वाची प्रवृत्ती, प्रकृती, तसेच त्याची कार्यक्षमता, अनुभव, प्रशासकावर नियंत्रण, आर्थिक शिस्त, कायद्याची समज, अशा क्षमता व गुण त्या नेतृत्वात असाव्या लागतात आणि हे गुण अविनाश मोहितेंमध्ये नाहीत असे त्यांनी आज स्पष्टच बोलून दाखवले
य. मो. कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत माजी चेअरमन डॉ. मोहिते बोलत होते
ते म्हणाले
यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत रयत संघर्ष मंचाने अखेर आपली भूमिका स्पष्ट करत सहकार पॅनेलला पाठिंबा जाहीर केला आहे. “संघर्षासाठी संघर्ष करून कारखाना कमकुवत करण्यापेक्षा, आम्ही सहकार पॅनेलला साथ देत आहोत,” असे सांगत डॉ. इंद्रजीत मोहिते म्हणाले, आमचा हा पाठिंबा अटींसह देत आहोत. सभासदांचे हित डावलले गेले तर भविष्यात निवडणुकीच्या संघर्षात उतरू, कारखाना टिकवणे आणि सहकाराची परंपरा जपणे हीच खरी जबाबदारी असल्याचेही ते म्हणाले आर्थिक ताण आणि राजकीय हस्तक्षेप यामुळे सहकार क्षेत्र अडचणीत आले आहे. अशा वेळी केवळ राजकीय भूमिका घेण्यासाठी संघर्ष करणे योग्य नाही,” असे सांगत संस्थापक आणि सहकार पॅनेल यांच्यातील दोन्ही बाजूंचा अभ्यास करूनच सहकार पॅनेलला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे डॉ इंद्रजित मोहिते म्हणाले “सहकार पॅनेलकडे कारखाना टिकवण्याची क्षमता आणि व्यवस्थापनाची दृष्टी दिसते. त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत या निवडणुकीत उभे राहत आहोत असेही त्यांनी स्पष्टपणे आज सांगितले
No comments:
Post a Comment