Friday, May 22, 2026

भाजपची शिवसेनाला 3 ते 4 जागा देण्याची तयारी - शिवसेनेचा 7 जागांवर ठाम राहण्याचा निर्णय ;

वेध माझा ऑनलाइन।
महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या 17 जागांसाठी लागलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये जागावाटपावरून मोठा पेच निर्माण झाल्याचं चित्र समोर येत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने या निवडणुकीत 7 जागांवर आपला ठाम दावा केला आहे. शिवसेनेने भाजपसमोर आधीच्या 5 आणि नव्याने ताकद वाढलेल्या 2 अशा एकूण 7 जागांचा अधिकृत प्रस्ताव ठेवला होता अशी माहिती समोर येत आहे. 

मात्र, भाजप कडून शिवसेनेच्या या प्रस्तावाला फारसा सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. भाजपने शिवसेनाला केवळ 3 ते 4 जागा देण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे आता शिवसेनेने 7 जागांवर ठाम राहण्याचा निर्णय घेत भाजपची कोंडी केली आहे.

या सर्व राजकीय घडामोडींवर शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षाची अधिकृत भूमिका स्पष्ट केली आहे. सरनाईक म्हणाले, "विधानपरिषदेसाठी कोणाला उमेदवारी द्यायची, याचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील. यापूर्वी धुळे, कोकण या भागांत आमचे 5 आमदार होते. आता पक्षाची ताकद वाढलेली असल्यामुळेच आम्ही 7 जागांची मागणी केली आहे. यावर महायुतीचे प्रमुख नेते एकत्र बसून अंतिम निर्णय घेतील."

No comments:

Post a Comment