वेध माझा ऑनलाईन
एकीकडे बर्ड फ्लूने नंदूरबार येथे कोंबड्यांचा मृ्त्यू झाल्याने चिंता व्यक्त केली जात असताना आपल्या शेजारील कर्नाटकातील तुमकुरु जिल्ह्यात ४४ मोरांचा मृत्यूने खळबळ उडाली आहे. या मोरांचाही मृत्यू H5N1 बर्ड फ्लूने झाल्याचे म्हटले जात आहे.
१६ एप्रिल पासून येथे मोरांच्या मृत्यूचे प्रमाण वाढल्यानंतर अखेर रिपोर्ट आल्याने या मोरांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झाले आहे. मोरांच्या मृत्यूमुळे प्रशासनाने १० किलोमीटरचा भाग कण्टोनमेंट झोन घोषीत केला आहे. आरोग्य आणि वन विभागाने या प्रकरणात एकत्र कारवाई सुरु केली आहे.
कर्नाटकातील तुमकुरु जिल्ह्यात १६ एप्रिलपासून मोरांचे मृत्यू होत होते. शेतामध्ये मरुन पडलेले मोर सापडत होते. या मोरांचा तपासणी अहवाल आल्यानंतर त्यांच्यात H5N1 बर्ड फ्लू व्हायरस सापडला आहे. त्यामुळे आता एक आठवड्यात ४४ हून अधिक मोरांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे.
No comments:
Post a Comment