Friday, May 1, 2026

४ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार ; ६५ वर्षीय नराधमाचे कृत्य ; पुण्यातील घटना ;

वेध माझा ऑनलाईन
एकीकडे राज्यभरात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला, अशातच पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे,  पुण्यातील भोर तालुक्यात एका ४ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून हत्या करण्यात आली आहे. एका ६५ वर्षीय नराधमाने हे कृत्य केलं आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. गावकऱ्यांनी पोलीस स्टेशनला घेराव घातला असून चिमुरडीचा मृतदेह स्टेशनबाहेर ठेवला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका 65 वर्षीय व्यक्तीने घरासमोर खेळणाऱ्या चिमुकलीला गोठ्यात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर  दगडाने ठेचून तिचा खून केला  आणि नंतर तीचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली झाकून ठेवला. दुपारी चिमुकली न दिसल्यानं तीचा शोधाशोध केल्यानंतर चिमुकली गोठ्यात मृत अवस्थेत आढळली. त्यानंतर परिसरातले सीसीटीव्ही फुटेज चेक केल्यानंतर आरोपी चिमुकलीला गोठ्याच्या दिशेनं घेऊन जाताना दिसला त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

No comments:

Post a Comment