रेठरे बुद्रुक (शिवनगर) तालुका कराड येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी सत्ताधारी सहकारमहर्षी जयवंतराव भोसले सहकार पॅनेलच्यावतीने कारखान्याचे विद्यमान संचालक दयानंद भीमराव पाटील (काले) यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाला.
यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आज पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. २२ मे पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. तर अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत ९ जून असून २१ जून ला मतदान तर २३ जूनला मतमोजणी होणार आहे.
आज पहिल्या दिवशी सोमवारी सत्ताधारी सहकारमहर्षी जयवंतराव भोसले सहकार पॅनलच्यावतीने कारखान्याचे विद्यमान संचालक दयानंद भीमराव पाटील (काले) यांनी गट क्रमांक २ काले-कार्वे उत्पादक सभासद गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्या समवेत कारखान्याचे संचालक जगदीशदादा जगताप, कराड पंचायत समितीचे सदस्य पै. धनंजय पाटील आदींसह कारखान्याचे माजी संचालक, सहकार पॅनलचे कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment