Sunday, May 31, 2026

सुप्रिया सुळे यांचे व्याही अरुण लखानी यांना भाजपकडून उमेदवारी ;

वेध माझा ऑनलाइन।
भाजपने जाहीर केलेल्या ११ उमेदवारांच्या यादीत नागपूरचे प्रसिद्ध उद्योगपती आणि भाजपचे सह-कोषाध्यक्ष अरुण लखानी यांचा समावेश आहे. भाजपने अरुण लखानी यांना चंद्रपूर-वर्धा-गडचिरोली या मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. अरुण लखानी हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांचे व्याही असून मुलगी रेवती सुळे यांचे होणारे सासरे आहेत. त्यामुळे या उमेदवारीची राज्यभर जोरदार चर्चा सुरू झाली आहे

आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी अरुण लखानी यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी त्यांना सुप्रिया सुळे आणि पवार कुटुंबाशी असलेल्या कौटुंबिक संबंधांवर प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी फारच चोखपणे उत्तर दिले. मी भाजपचा जुना कार्यकर्ता आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मी भाजप पक्षाचे प्रामाणिकपणे काम करत आलो आहे. पवार साहेब हे देशातील आणि राज्यातील खूप मोठे नाव आहे. ते एक मोठे राजकीय कुटुंब आहे. त्या व्यतिरिक्त आमचे केवळ कौटुंबिक संबंध आहेत, त्यात कोणतेही राजकारण नाही, अशी प्रतिक्रिया अरुण लखानी यांनी दिली.

No comments:

Post a Comment