वेध माझा ऑनलाईन
नीट पेपरफुटीचं नाशिक कनेक्शन समोर आलं आहे. केरळ आणि राजस्थान पाठोपाठ आता नाशिक कनेक्शन देखील असल्याचं समोर आल्याने खळबळ उडाली आहे. नीट पेपर ३ मे रोजी पार पडला, मात्र तो पेपर ४२ तास आधीच विद्यार्थ्यांच्या व्हाट्स अप आणि टेलिग्रामवर आला होता.600 मार्कांचा पेपर एकदम तंतोतंत असल्याचं समोर आलं होतं. यामुळे आता पेपर लीक प्रकरणी नीट परीक्षाच रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणाचं नाशिक कनेक्शन समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
हे नाशिक कनेक्शन आहे काय ?
फुटलेल्या पहिल्या पेपरची कॉपी ही नाशिकमध्ये पोहोचली आणि तिथून हरियाणापर्यंत गेल्याची माहिती मिळाली आहे. नाशिकमध्ये ही पेपरफुटी झाली पहिली प्रत तयार झाली आणि इतर ठिकाणी या प्रती पोहोचवण्यात आल्या होत्या.नाशिकमध्ये पुन्हा हे कांड समोर आल्यानं खळबळ उडाली आहे 3 मे रोजी झालेल्या पेपर फुटल्यामुळे ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच पेपरफुटीच्या संपूर्ण प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान 3 मे 2026 रोजी नीटची परीक्षा झाली. राजस्थानमध्ये परीक्षेच्या एक दिवसआधी एक गेस पेपर बाहेर आला. गेस पेपरमधील तब्बल 125 प्रश्न नीट पेपरमध्ये आले. फिजिक्स आणि बायोलॉजी विषयांतील अनेक प्रश्न जुळले.
परीक्षेच्या दिवशीच राजस्थानच्या सीकर पोलिसात तक्रार दाखल केली. विद्यार्थ्यांनी पुराव्यांसह एनटीएकडे तक्रार केली. एनटीएकडून राजस्थानच्या डीजीपींना पत्र देण्यात आलं. स्पेशल ऑपरेशन्स ग्रुपनं चौकशी सुरू केली.
विद्यार्थ्यांच्या मोबाईल चॅट आणि पुराव्यांची चौकशी केली. या सगळ्याचा मास्टरमाइंड कोण आहे याबाबत अद्याप समजू शकलेलं नाही. पोलिसांनी या प्रकरणी 10 हून अधिक लोक ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.
No comments:
Post a Comment