वेध माझा ऑनलाइन।
भाजपने विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी 11 जागांसाठी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात सांगली-सातारा – मधून श्री धैर्यशील कदम यांना उमेदवारी देण्यात आली आहे
तसेच धाराशिव लातूर बीडमधून बसवराज पाटील, अहिल्यानगरमधून प्राजक्त तनपुरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भंडारा-गोंदिया मतदारसंघातून अविनाश ब्राह्मणकर, अमरावतीतून प्रविण पोटे पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तसेच जळगाव मधून नंदकिशोर महाजन आणि नागपूरमधून डॉ.राजीव पोतदार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. हे सर्व उमेदवार आता उद्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
भाजपचे 11 उमेदवार
वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली – श्री अरुण लखानी
भंडारा-गोंदिया – श्री अविनाश ब्राह्मणकर
अमरावती – श्री प्रविण पोटे पाटील
सांगली-सातारा – श्री धैर्यशील कदम
सोलापूर – श्री राजेंद्र राऊत
अहिल्यानगर – श्री प्राजक्त तनपुरे
छत्रपती संभाजीनगर-जालना – श्री सुहास शिरसाट
नांदेड – श्री अमर राजूरकर
धाराशिव-लातूर-बीड – श्री बसवराज पाटील
जळगाव – श्री.नंदकिशोर महाजन
नागपूर – डॉ.राजीव पोतदार
No comments:
Post a Comment